Sherlyn Chopra reacts on pathaan besharam rang bikini song of deepika padukone Google
मनोरंजन

Pathaan:दीपिकाच्या भगव्या बिकिनीला पाहून शार्लीननं तोडले अकलेचे तारे; आगीत तेल ओतत म्हणाली,'भगवा रंग हा..'

'पठाण' मधील 'बेशरम रंग' गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरनं देशभरात वाद रंगलेला असताना आता बॉलीवूडमधूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत.

प्रणाली मोरे

Pathaan Controversy: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांचा बहुचर्चित 'पठाण' सिनेमा रिलीजच्या आधीच वादात सापडला आहे. याचे कारण आहे सिनेमातील 'बेशरम रंग' हे गाणं. 'बेशरम रंग' गाण्यात दीपिका पदूकोणनं घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीला पाहून अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. यानंतर आता देशभरात सिनेमाला घेऊन मोठा वाद पेटला आहे. प्रकाश राज आणि पायल रोहतगीनंतर आता अभिनेत्री शार्लिन चोप्रानं आपल्या अकलेचे तारे तोडत आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. (Sherlyn Chopra reacts on pathaan besharam rang bikini song of deepika padukone)

'पठाण' सिनेमावरनं पेटलेल्या वादावर शार्लिन चोप्रा म्हणाली आहे, ''बॉलीवूडमधल्या एका विशिष्ट गॅंगशी जवळचं नातं असणाऱ्या दीपिका पदूकोणनं भगव्या रंगाची बिकिनी घालत 'बेशरम रंग' गाण्यावर डान्स केला आहे. नक्कीच त्या लाखो हिंदू लोकांच्या मनाला हे पटलं नसेल,जे भगव्या रंगाला पवित्र, श्रद्धा आणि भक्तीचा रंग मानतात''.

यानंतर शार्लिन चोप्राने भाजपाचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या 'पठाण' सिनेमाविरोधातील वक्तव्याचं समर्थन केलं आहे. शार्लिन म्हणाली आहे,''मी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याशी सहमत आहे''.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा नक्की काय म्हणाले होते? एका पत्रकार परिषदेत नरोत्तम मिश्रा यांना एक प्रश्न विचारला गेला होता. 'शाहरुख खान वैष्णो देवीच्या चरणी लीन झाला,आमिर खाननं हिंदू पद्धतीनं पूजा केली.. या बदलाकडे तुम्ही कसे पाहता?'

त्यावर उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की,''समाजात आता जागरुकता आली आहे. ही गोष्ट आता या कलाकारांना समजली आहे,चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना आपल्या श्रद्धेनुसार पूजा-अर्चना करण्याचा हक्क आहे. तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्याची तुम्ही पूजा करा. पण लक्षात ठेवा यामुळे कोणाच्या भावनांना दुखवू नका''.

पठाण हा दीपिकाचा काही पहिलाचा सिनेमा नाही जो वादात पडला आहे. याआधी 'पद्मावत','राम-लीला','छपाक' आणि 'बाजीराव मस्तानी' सारखे तिचे बडे सिनेमे वादाच्या भोवऱ्यात अडकलेच होते. पण या वादांचा दीपिकाच्या सिनेमावंर आणि त्यांच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर काहीच परिणाम झाला नव्हता. तिच्या सगळ्याच सिनेमांनी बॉक्सऑफिसवर बजेटपेक्षा अधिक कमाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT