Aditya Narayan  esakal
मनोरंजन

Aditya Shweta Good News: उदित नारायण झाले 'आजोबा'

प्रसिद्ध गायक उदित नारायण हे आता आजोबा झाले आहेत

सकाळ डिजिटल टीम

bollywood news: प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) हे आता आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (Shweta Agrawal) यांनी गुड न्युज दिली आहे. श्वेतानं एका मुलीला जन्म दिला आहे. श्वेता आणि आदित्य यांनी 24 तारखेलाच गुड न्युज दिली होती. आदित्यनं सोशल मीडियावर ही बातमी शेयर (Entertainment News) केल्यानंतर त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. आदित्यनं गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीतून खास गोष्ट चाहत्यांना शेयर केली होती. (Bollywood Celebrites) त्यामध्ये त्यानं आपल्याला एक छानशी परी हवी असल्याचं सांगितलं होतं. आता आदित्य आणि श्वेतावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

आदित्यनं बॉम्बे टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, चाहत्यांनी मला सांगितले होते की, तुला मुलगा होणार आहे. मात्र मला नेहमीच मुलगी हवी होती. आणि तसचं झालं. मी खूप आनंदी झालो आहे. मुली नेहमीच आपल्या वडिलांच्या जवळ असतात. आता माझ्या घरी छोट्या परीचं आगमन झाल्यानं आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. तिनं आम्हाला मोठा आनंद दिला आहे. घरातले सर्वजण खूप आनंदी आहेत. एक गोष्ट मला यानिमित्तानं कळाली ती म्हणजे, श्वेताच्या गरोदरपणाच्या काळात मी नेहमीच तिच्यासोबत होतो. एखादी स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिला किती मोठ्या प्रसंगातून जावं लागतं. हे मला तेव्हा समजलं. तिला खूप हिंमत दाखवावी लागते.

आदित्य हा उदित नारायण यांचा मुलगा असून तो प्रसिद्ध होस्टही आहे. त्यानं इंडियन आयडॉलचे होस्टिंग केले आहे. याविषयी त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, मी एका संगीत फॅमिलितून आलो आहे. संगीत माझ्या डीएनएमध्ये आहे. मी आता पुन्हा गायकीला सुरुवात करणार आहे. नव्या परीसाठी मला सुरुवात करावी लागेल. एकुणच खूप आनंदी वातावरण आहे. अशी प्रतिक्रिया आदित्यनं यावेळी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT