Udit Narayan Heart Attack esakal
मनोरंजन

Singer Udit Narayan यांना आला हार्ट अटॅक? फॅन्सचं वाढलं टेंशन...मॅनेजरने सांगितलं सत्य

उदित नारायण यांच्या हार्ट अटॅकच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसलाय

सकाळ डिजिटल टीम

Udit Narayan Heart Attack News: ज्यांच्या आवाजाने सगळी बॉलीवूडची गाणी गाजायची असे दिग्गज बॉलीवूड सिंगर उदित नारायण यांना हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आणि फॅन्सना धक्काच बसला. ट्विटरवर नारायण यांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या ट्रेंड करत करत आहे. त्यामुळे प्रत्येक चाहता त्यांच्या आवडत्या सिंगरला हार्ट अटॅक आल्याच्या बातमीने दु:खी झाला. मात्र हे खरं होतं काय? याबाबतचा खुलासा आता त्यांच्या मॅनेजरने केलाय.

उदित नारायण याच्या मॅनेजरने सांगितलं सत्य

'चाहत्यांना चिंता करण्याचं कारण नाही. उदित नारायण यांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या साफ खोट्या आहेत. उदित नारायण यांचं आरोग्य अगदी ठणठणीत आहे. तसेच त्यांच्या आरोग्याबाबत चाललेल्या या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे'ही त्याने सांगितले.

अचानक उदित नारायण यांच्या आरोग्याबाबत अशा खोट्या बातम्या का व्हायरल होताय याची आम्हाला अजिबात कल्पना नाही. मात्र या व्हायरल बातम्यांनंतर आम्हाला सतत चाहत्यांचे फोन कॉल्स येत आहेत. ट्विटरवर त्यांच्या आरोग्याबाबत खोट्या बातम्या ट्रेंड होताना बघून नारायण यांना फार दु:ख झालं. माझं त्यांच्याशी बोलणं झालं असून त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत असल्याचं त्यांनी मला खुद्द सांगितलं आहे. असेही नारायण यांच्या मॅनेजरने स्पष्टिकरण देत चाहत्यांना दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अघोरी कृत्य! २७ दिवसांच्या बाळाच्या पोटावर चटके, आठवड्याभरात दुसरी घटना; नेमकी अंधश्रद्धा काय?

Pune News : वैद्यकीय शिक्षण विभागातील अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्‍वासन

W,W,W,W,W! पाच चेंडूंत पाच विकेट्स; २६ वर्षीय गोलंदाजाचा क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, जगातला पहिलाच खेळाडू, Video Viral

Harjeet Singh Laddi: मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अन्...; कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबाराची जबाबदारी स्विकारणारा हरजीत सिंग लड्डी कोण?

धक्कादायक! सहा वर्षांच्या चिमुकलीचं ४५ वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं; तालिबानी म्हणाले, ९ वर्षांची होईपर्यंत वाट पाहा

SCROLL FOR NEXT