sushant singh rajput  Esakal
मनोरंजन

Sushant Singh Rajput: 'सुशांत मृत्यूमागे मागे मोठं षडयंत्र'... वकिलाचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला. त्याला जावून अडीच वर्ष झाली असली तरी त्याच्या चाहत्यासाठी तो अजूनही जिवंतच आहे. त्याने आत्महत्या केली असावी यावर अजूनही त्यांचा विश्वास बसत नाही. त्यांची बहिण अजूनही त्याला ज्ञाय मिळावा यासाठी लढत आहे.

त्यातच आता या प्रकरणाला अजून वेगळं वळण मिळालंय. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली होती, असा दावा कूपर रुग्णालयातल्या शवागृहात काम करणाऱ्या रुपकुमार शाह यांनी केला आहे. सुशांतचा मृतदेह आला तेव्हा त्याच्या मृतदेहावर जखमा होत्या, शरीराला मुका मार लागला होता, असंही शाह यांनी सांगितलं होतं. आता त्यातच या वक्तव्यानंतर आता सुशांत सिंह राजपूत याच्या वकीलानंही प्रतिक्रीया दिली आहे. विकास सिंह याच्या म्हणण्यानूसार सुशांतचा मृत्यू ही थेट आत्महत्या नसल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेत्याचा मृत्यू हे एक मोठे षडयंत्र असल्याचं त्यांनी सांगितले.

विकास सिंह यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, मी सध्या या विषयावर फार काही बोलू शकत नाही. पण सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू ही साधी आत्महत्या नव्हती, असं मला म्हणायचे आहे. यामागे मोठे षडयंत्र होते. या मृत्यूमागील कट सीबीआयच उघड करू शकतं.

हेही वाचा:जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

तर दूसरीकडे सुशांतची बहीण श्वेता सिंग हिनेही कूपर हॉस्पिटलच्या त्या कर्मचाऱ्याच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले होते की, आम्ही सीबीआयला विनंती करतो की जर या विधानात सत्यता असेल तर या व्यक्तीला सुरक्षा देण्यात यावी. या खटल्यासाठी प्रत्येक पुरावा महत्त्वाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT