The Kashmir Files  
मनोरंजन

The Kashmir Files Trailer: तुला तुझ्या आईला मारायला सांगितलं तर...

द कश्मीर फाइल्स'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो आपल्याला काश्मीर मधील त्यावेळच्या दु:खद भावनेची रोलरकोस्टर सफर घडवतो.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: 'द ताष्कंद फाइल्स'नंतर, निर्माता कश्मीर नरसंहार (entertainment news) पीडीतांच्या सत्यकथेवर आधारित एक थक्क करणारा, मनोवेधक चित्रपट घेऊन परत येत आहेत. दर्शकांना त्यावेळी (Bollywood Movies) काश्मीरात पसरलेला आतंकवाद आणि भयानक दहशतीची झलक देत, 'द कश्मीर फाइल्स'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून (The Kashmir Files) तो आपल्याला काश्मीर मधील त्यावेळच्या दु:खद भावनेची रोलरकोस्टर सफर घडवतो. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होते. त्याच्या पोस्टरनं देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, (Bollywood Celebrity) अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती तसेच, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक अशा दिग्गजांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात, “काश्मीर नरसंहाराची कथा मोठ्या पडद्यावर आणणे सोपे काम नव्हते आणि ते अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावे लागले. हा चित्रपट डोळे उघडतो. आणि प्रतिभावान कलाकारांच्या जोडीने, भारतीय इतिहासातील हा अध्याय वास्तविक कथनाद्वारे दर्शक पुन्हा एकदा पाहू शकतील."

अभिनेत्री पल्लवी जोशी सांगतात, “एक चित्रपट तितकाच उत्तम असतो जितकी त्याची स्क्रिप्ट आणि द काश्मीर फाईल्सच्या सहाय्याने प्रेक्षक पात्रांच्या भावना अनुभवू शकतात आणि सहन करू शकतात ज्यातून ती पात्र गेली आहेत. प्रत्येक कलाकाराने स्वतःला त्या पात्रांमध्ये पूर्णपणे समर्पित केलं आहे. आणि ते ही धक्कादायक आणि दुःखद कथा सांगण्यासाठी वचनबद्ध आहे." 'द कश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून झी स्टुडिओज, आय एम बुद्धा आणि अभिषेक अग्रवाल आर्ट्सच्या बॅनरखाली तेज नारायण अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची निर्मिती आहे. हा चित्रपट 11 मार्च 2022 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT