Emran Hashmi Instagram
मनोरंजन

'ही तर लेडी इम्रान हाश्मी', KRK च्या ट्वीटने 'त्या' अभिनेत्रीचे चाहते भडकले

बिग बॉस ३ चा कंटेस्टंट आणि वादग्रस्त अभिनेता कमाल आर खान सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

बिग बॉस ३ चा कंटेस्टंट आणि वादग्रस्त अभिनेता कमाल आर खान(KRk) सोशल मीडियावर(Social Media) आपल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. कमाल आर खानला यामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. त्यानं सोशल मीडियावर एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीला(Bollywood Actress) लेडी इमरान हाश्मी(Lady Emran Hashmi) म्हणून संबोधलं आहे. आणि त्यामुळे त्या अभिनेत्रीच्या चाहत्यांनी त्याच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदवून त्याला सळो की पळो करुन सोडलं आहे. कोण आहे ती अभिनेत्री,जिच्या चाहत्यांनी कमाल आर खान विरोधात ट्वीटरवर बंड पुकारला आहे.(Bollywood's Lady Emran Hashmi? who trolls bollywood famous actress?)

कमाल आर खाननं सोशल मीडियावर कियारा अडवाणीला(Kiara Advani) ट्रोल केल्याचं दिसून आलंय. त्यानं वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या 'जुग जुग जियो' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाला देखील ट्रोल केलेलं आहे. याचवेळी त्यानं कियारा अडवाणीला लेडी इमरान हाश्मी म्हणून संबोधलं आहे. केआरके ने कियारा अडवाणीला टार्गेंट करत एक ट्वीट केलं,ज्यात त्यानं लिहिलं, 'मुलींमधली इमरान हाश्मी'.

२८ जून २०२२ ला केआरके ने ट्वीट करताना वरुण धवन,कियारा अडवाणीच नाही तर त्यांच्या 'जुग जुग जियो' सिनेमाविषयी देखील काही पोस्ट केल्या. त्यानं ट्विटरवर लिहिलं-''मुलींमधली इमरान हाश्मी. हाइट कमी,किस जास्त. कियारा अडवाणीनं आतापर्यंत 'कबीर सिंग','भूलभूलैय्या २' हे दोनच हीट दिले आहेत. तर 'लक्ष्मी','कलंक','इंदु की जवानी','टाइम मशीन' आणि 'जुग जुग जियो' या तिच्या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर अक्षरशः मान टाकली''. केआरकेच्या ट्वीटनंतर मात्र कियाराचे चाहते त्याच्यावर भलतेच भडकलेयत. त्यांनी कियाराच्या 'एम.एस.धोनी','शमशेरा','गूडन्यूज' अशा हिट सिनेमांची यादीच त्याच्यासमोर ठेवलीय.

केआरकेनं 'भूलभूलैय्या २' च्या यशाचं श्रेय कार्तिक आर्यनला दिलं आहे. आणि सोबत लिहिलं आहे-'''जुग जुग जियो' ची अवस्था बॉक्सऑफिसवर एकदम वाईट आहे. लेडी इमरान हाश्मी म्हणजे कियारा अडवाणीचे सिनेमे पहायला कोणी जात नाही. 'भूलभूलैय्या २' कार्तिक आर्यन आणि अनिस भाई यांच्यामुळे ब्लॉकबस्टर बनला''.

तसंच,केआरकेनं 'जुग जुग जियो'ला 'डिझास्टर' सिनेमा म्हटलं आहे. त्यानं वरुण धवन आणि करण जोहर संदर्भातही काही ट्वीट्स केले आहेत,आणि त्यांच्यावर जोक्सही मारले आहेत. २४ जून २०२२ रोजी 'जुग जुग जियो' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमानं पहिल्या आठवड्यात ३५ करोडचा बिझनेस केला. त्यानंतर मात्र सिनेमाच्या कमाईला बॉक्सऑफिसवर उतरती कळा लागली आहे. पण तरीही सिनेमाचं नाव अधिक कमाई करणाऱ्या सिनेमांत का घेतलं जात आहे हा गहन प्रश्न आहे. अर्थात कलाकारांची कामं उत्तम आहेत यात दुमत नाही. पण प्रेक्षकांनी त्यात फार रस दाखवलेला नाही हे देखील तितकंच खरं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT