boman irani birthday actor worked as waiter at taj hotel started acting at age 42 sakal
मनोरंजन

Boman Irani Birthday: हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारे बोमन इराणी आज बॉलीवुड गाजवतायत..

वायरास म्हणून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेल्या बोमन इराणी यांचा आज वाढदिवस..

सकाळ डिजिटल टीम

Boman Irani Birthday: 'मुन्नाभाई', 'थ्री इडियटस्' अशा दर्जेदार चित्रपटातून दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेता बोमन इराणी यांचा आज 64 वा वाढदिवस आहे. बोमन यांना आज प्रचंड प्रसिद्धी मिळाली असली तरी त्यांनी खूप उशिरा मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. बोमन इराणी यांनी वयाच्या ४२ वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

ना कोणता गॉडफादर ना कोणी परिवातील फिल्म इंडस्ट्रीत होते. तरीही स्वतःच्या हिंमतीने आणि अभिनयाने त्यांनी नाव कमावले. एकेकाळी ते ताज हॉटेल मध्ये वेटर होते, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांचा प्रवास..

(boman irani birthday actor worked as waiter at taj hotel started acting at age 42)

बोमण इराणी यांच्या जन्म २ डिसेंबर १९५९ मध्ये मुंबई येथे झाला. एका साध्या पारसी परिवारमध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून परिस्थितीने चटके दिले ,बोमन इराणी यांनी कमी वयात काम सुरु केले होते. पण त्यांना नेहमीच फोटोग्राफर बनायचं होतं. त्यांच्या चाहत्यांना माहिती नाही बोमन इराणी उत्कृष्ट फोटोग्राफर देखील आहेत.

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी ताज हॉटेलमध्ये काही काळ नोकरी देखील केली. बोमन इराणी ताज हॉटेलमध्ये वेटर आणि सर्व्हिस स्टाफ म्हणून काम करत होते. २ वर्ष त्यांनी ही नोकरी केली. पुढे त्यांच्या जीवनात एक टर्निंग पॉईंट आला

बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक डावर यांच्या भेटीमुळे बोमन इराणी यांचं आयुष्य बदललं. शामक डावर यांनीच बोमन इराणी यांना थिएटर जॉईन करण्याचा सल्ला दिला.

इथूनच त्यांच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाला सुरुवात झाली. 'मुन्नाभाई मधील मधील डॉ. अस्थाना असो ३ इडियट्स' मधील व्हायरस भूमिकेने बोमन इराणी यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं.

पेज-3 मधील एक शांत न्यूज एडिटरची भूमिका असो किंवा पी.के मधल्या कॉमेडी एडिटरची भूमिका दोन्ही भूमिकांमध्ये आपली चांगली छाप पाडली. नो एन्ट्री', वीर झारा, डॉन,लक्ष्य, हॅप्पी न्यू इयर, अशी न संपणारी लिस्ट आहे. बोमन इराणी यांचा नुकतेच 'उंचाई’ चित्रपट रिलीज झाला होता त्यामध्ये देखील त्यांनी परत दाखवून दिले " वय कितीही असो आपले काम मेहनतीने करा".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT