sridevi, boney kapoor, boney kapoor sridevi wedding anniversary SAKAL
मनोरंजन

Boney Kapoor: आमचं शिर्डीत लग्न झालं आणि... लग्नाच्या वाढदिवशी बोनी कपूर यांना सतावतेय Sridevi ची आठवण

निर्माते बोनी कपूर यांनी त्यांच्या २७ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण काढली

Devendra Jadhav

Boney Kapoor write emotional post for Sridevi News: अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नसली तरीही श्रीदेवीची आठवण येणार नाही असा एकही दिवस नाही. आज बोनी कपूर यांना श्रीदेवीची आठवण आलीय.

कारण सुद्धा तसंच खास आहे. निर्माते बोनी कपूर यांनी त्यांच्या २७ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण काढली.

(boney kapoor remember sridevi on their 27th wedding anniversary)

बोनी कपूर यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्रीदेवीसोबतचा एक फोटोही शेअर केला असून एक छोटीशी चिठ्ठीही लिहिली आहे. 2 जून रोजी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी एकमेकांशी लग्न केले.

या दिवशी दोघांनी एकमेकांचा हात धरून सात फेरे घेतले होते. पण आज हा खास दिवस साजरा करण्यासाठी श्रीदेवी बोनीसोबत नाहीत.

वास्तविक बोनी कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर श्रीदेवीसोबत बोटीत बसलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूप जुना आहे. छायाचित्रात हे जोडपे व्हेनिसमध्ये बोटीतून प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहे.

या फोटोद्वारे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत चित्रपट निर्मात्याने लिहिले की, "2 जून 1996 रोजी शिर्डीत आमचे लग्न झाले. आज या लग्नाला 27 वर्षे पूर्ण झाली आहेत." बोनीच्या या फोटोवर कमेंट करून चाहते श्रीदेवीची सतत आठवण काढत आहेत.

सांगायचं झालं तर... श्रीदेवी आणि बोनी यांचे लग्न 1996 मध्ये झाले होते. अनिल कपूर, उर्मिला मातोंडकर स्टारर 'जुदाई' हा त्यांचा लग्नापूर्वीचा शेवटचा चित्रपट होता.

लग्नानंतर बोनी आणि श्रीदेवी यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली झाल्या. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीचे UAE मध्ये निधन झाले,

जिथे ती पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत एका कौटुंबिक लग्नाला गेली होती. श्रीदेवीच्या अकस्मात निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी कलाकारांची ठाकरेंच्या मेळाव्याला मोठी हजेरी – कोण कोण आले आहे?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT