83 Movie Sakal
मनोरंजन

प्रदर्शनाच्या दिवशीच '83'वर बंदीची मागणी; काय आहे कारण?

दीपिका पदुकोणमुळे चित्रपटासमोर अडचणी?

स्वाती वेमूल

२५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेटप्रमी कधीच विसरू शकत नाहीत. या दिवशी कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकला होता. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला भारतीय क्रिकेट संघाने चारी मुंड्या चीत केले होते. तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी ही कामगिरी होती. याच विजयगाथेवर '83' हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज (२४ डिसेंबर) प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शनाच्या दिवशीच या चित्रपटावर बंदीची मागणी होतेय. ट्विटरवर 'Boycott 83' असा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होतोय. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरावा, अशी मागणी नेटकरी करतायत. (83 Movie)

नेमकं काय आहे कारण?

या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची तर दीपिका पदुकोण ही त्यांची पत्नी रुमी यांची भूमिका साकारतेय. दीपिका या चित्रपटाची निर्मातीसुद्धा आहे. जेव्हापासून दीपिकाने जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ हात पुढे होता, तेव्हापासून लोकांमध्ये तिच्याबद्दल नाराजी दिसून येत आहे. दीपिकाच्या प्रॉडक्शनने 'तुकडे-तुकडे गँग'ला पाठिंबा दिल्याचं सांगून लोकांना हा चित्रपट न पाहण्याचं आवाहन केलं जात आहे. दीपिकाचा 'छपाक' चित्रपट प्रदर्शित होत असतानाही लोकांनी अशाच पद्धतीने राग व्यक्त केला होता. लोकांनी या चित्रपटावरही बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.

काही नेटकऱ्यांनी कबीर खान, रणवीर सिंग यांच्यावरही विविध आरोप करत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, जिवा, साकिब सलीम, जतीन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर आणि एमी विर्क अशी कलाकारांची मोठी फौज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT