Suniel Shetty Cm Yogi Adityanath Esakal
मनोरंजन

Suniel Shetty: "बॉलिवूडला बॉयकॉट करणं थांबवा", सुनिल शेट्टीची सीएम योगींना विनंती..

Vaishali Patil

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईतल्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची भेट त्यांनी घेतली. सिने जगतातील लोकांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. खरं तर, उत्तर प्रदेशमध्ये एक फिल्म सिटी बनवली जात आहे, ज्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी चित्रपट कलाकारांशी चर्चा केली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच सुनील शेट्टी, सुभाष घई, जॅकी श्रॉफ, सोनू निगम आणि बोनी कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची भेट घेतली.

दरम्यान, सुनील शेट्टी यांनी योगी आदित्यनाथ यांना बॉलीवूडवरील बहिष्काराचा ट्रेंड संपवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. सुनील शेट्टी म्हणाले की, बॉलीवूडची डागाळलेली प्रतिमा सुधारता यावी यासाठी बॉयकॉटचा टॅग काढून टाकणं अत्यंत आवश्यक आहे. बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड तुमच्या सांगण्यावरुन बंदही होऊ शकतो. बॉलिवूड कलाकारांनी याआधी चांगले कामही केले आहेत असंही ते म्हणाले.

काही काळापासून बॉलिवूडबाबत सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवण्याचं काम करण्यात येत आहे. गेल्या २-३ वर्षात या ट्रेंडमुळे अनेक हिंदी चित्रपटांना यांचा फटका बसला आहे.

2022 मध्ये आमिर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' ते अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन', 'दोबारा' आणि 'लिगर' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. लोकांमध्ये बॉलीवूड आणि हिंदी चित्रपटांबद्दल इतका राग आहे की आता चित्रपटाचे नाव ऐकताच लोक त्याविरोधात बॉयकॉट ट्रेंड करु लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पहाटे पाचला उठतो, देव देव तरी करायला सांगा किंवा विकास कामं सांगा; अजितदादांनी हातच जोडले, काय घडलं?

Amitabh Bachchan Birthday: 82व्या वर्षीही करतात दिमाखात काम! जाणून घ्या बिग बींच्या फिटनेसचं रहस्य

Ladki Bahin Yojana: बहिणींच्या ई-केवायसीला ‘सर्व्हर’चा खोडा; ओटीपी मिळेना, लाभ बंद होण्याची सतावते भीती

Fake Currency Racket : बनावट नोटा खपवण्यासाठी पोलीस कर्मचारी आठवडाभर रजेवर, कोल्हापुरात टोळीचा पर्दाफाश; 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादव संघाबाहेर, सर्फराज खानची एन्ट्री! संघात झाला बदल, कॅप्टनपदी....

SCROLL FOR NEXT