Boycott Laal Singh Chaddha Swara Reaction
Boycott Laal Singh Chaddha Swara Reaction  esakal
मनोरंजन

Boycott Laal Singh Chaddha: 'तू ज्ञान नको पाजळू!' स्वराला नेटकऱ्यांनी झापलं

युगंधर ताजणे

Boycott Laal Singh Chaddha: आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधनवर नेटकरी टीका करण्याचे काही थांबत नाहीयेत. गेल्या (Boycott Rakshabandhan) काही दिवसांपासून त्यांनी आक्रमकपणे या दोन्ही चित्रपटांच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वास्तविक आमिर आणि (Bollywood movies) अक्षय यांनी चाहत्यांची माफी मागितली असून प्रेक्षकांनी त्यांचा राग हा चित्रपटावर काढू नये. आमच्याकडून कुणाच्या भावना दुखावल्या (Bollywood Actress Swara Bhaskar) गेल्या असल्यास आम्ही त्यांची माफी मागतो असे म्हटले आहे. मात्र नेटकरी काही ऐकायला तयार नाहीत. त्यांनी लाल सिंग चढ्ढा आणि रक्षाबंधन या दोन्ही चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

यासगळ्यात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वराला प्रतिक्रिया देणं चांगलंच महागात पडलं आहे. तिनं अक्षय आणि आमिरची बाजू घेऊन त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या परखड भूमिकेसाठी स्वरा ओळखली जाते. यापूर्वी देखील तिनं केलेल्या प्रतिक्रियांवर नेटकऱ्यांच्या जशास तशा प्रतिक्रिया आल्या आहेत. यावेळी स्वराला आमिर, अक्षयची बाजू घेणं महागात पडलं आहे. आमिरनं त्याच्या एका मुलाखतीमधून प्रेक्षकांना ज्यांना हा चित्रपट पाहायचा आहे त्यांनी तो पाहावा, ज्यांना नाही पाहायचा त्यांच्याविषयी आपण काही बोलणार नाही. असे म्हटले होते.

यासगळ्या परिस्थितीवर स्वरानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणते, व्हाट्स अपवर जे काही मेसेज येत आहेत त्यावर काही विश्वास ठेऊ नका. त्यासगळ्या अफवा आहेत. प्रेक्षकांना मी आवाहन करते की त्यांनी आमिर आणि अक्षयचे चित्रपट जरुर पाहावेत. यावर तिनं लाल सिंग चढ्ढा आणि आनंद एल रायच्या रक्षाबंधनला शुभेच्छाही दिल्या आहेत. तिचं हे व्टिट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युझर्सनं म्हटलं आहे की, तू आम्हाला ज्ञान पाजळू नको, आम्हाला काय वाटतं ते आम्ही करणार आहोत.

दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, तू जा चित्रपट पाहा. आणि व्टिट करण्याचे डबल पैसे दे, आणखी एका युझर्सनं म्हटलं आहे की, आता जी लोकं हे चित्रपट पाहण्यासाठी जात होती ती तुझं ट्विट वाचून जाणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये एका वेगळ्याच प्रकारचा ट्रेंड सुरु झाला आहे. बॉयकॉट बॉलीवूड, त्यासोबतच बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा आणि रक्षाबंधन याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT