Bollywood Celebs Boycott Maldives:  Esakal
मनोरंजन

Boycott Maldives: बॉयकॉट मालदीव चलो लक्षद्वीप! अक्षय, सलमानपासून जॉन, श्रद्धापर्यंत 'या' सेलिब्रिटींनी दिला नारा...

मालदीवचे मंत्री अब्दुल्ला महझूम मजीद यांनी भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण टिप्पणी केल्यानंतर आता सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत.

Vaishali Patil

Bollywood Celebs Boycott Maldives:  सध्या भारतात बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरु आहे. मालदीव सरकारमधील एका मंत्र्याने केलेल्या वक्तव्याचे भारतात पडसाद उमटत आहेत. मालदीव सरकारमधील मंत्री मरियम शिऊना यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्यानंतर वातावरण तापले.

मालदीवचे मंत्री अब्दुल्ला महझूम मजीद यांनी भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण टिप्पणी केल्यानंतर आता सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. अचानक बॉयकॉट मालदीव ट्रेंड सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. केवळ सामान्य लोकच नाही तर भारतीय सेलिब्रिटींनीही मालदीव न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता अक्षय कुमार आणि सलमान खान, जॅकलिन फर्नांडिससह अनेक सेलिब्रिटींनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत चाहत्यांना लक्षद्वीपला जाण्याचे आवाहन केले.

या प्रकरणावर ट्विट करताना अक्षय कुमारने लिहिले - "मी मालदीवमधील नेत्यांनी भारतीयांवर केलेल्या काही द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या पाहिल्या. सर्वात जास्त पर्यटक पाठवणाऱ्या देशाबद्दल ते असं बोलताय हे आश्चर्यकारक आहे.

आपण चांगले आहोत पण असा द्वेष का सहन करायचा? मी अनेकदा मालदीवमध्ये गेलो आहे आणि त्यांचे नेहमीच कौतुक केले आहे, परंतु सन्मान प्रथम येतो. चला #IndianIslands एक्सप्लोर करूया आणि आपल्या देशाच्या पर्यटनाला पाठिंबा देऊ या."

तर सलमान खानने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत मालदीववर टीका केली आहे. सलमानने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांवर पाहून खूप आनंद झाला आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे आपल्या भारतात आहे.'

तर जॉन अब्राहम हा अशा काही मुद्यावर कमीच बोलतो तरी देखील जॉनने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने समुद्रकिनाऱ्यांची फोटो शेअर करत लिहिले, 'अतिथी देवो भव' या कल्पनेने आणि विशाल सागरी जीवनाचा शोध घेऊन, 'अप्रतिम भारतीय आदरातिथ्य. लक्षद्वीप हे पाहण्यासारखे ठिकाण आहे.'

श्रद्धा कपुरने लिहिले, 'हे फोटो आणि मीम्स आता मला सुपर FOMO बनवत आहेत. लक्षद्वीपला मूळ किनारा आहे. स्थानिक संस्कृतीची भरभराट होत आहे, मी एका सूट्टीचा प्लॅन करत आहे.'

जॅकलिन फर्नांडिसने लिहिले, '2024मध्ये प्रवास आणि घराजवळील सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणं एक्सप्लोर करुया. माझ्या यादीत सर्वप्रथम नंदनवन लक्षदीप बेट आहे. या वंडरलैंडबद्दल इतकं ऐकलंय की मी तिथे येण्याची वाट पाहू शकत नाही.'

कार्तिक आर्यन , रणदीप हुडा, पूजा हेगडे, जान्हवी कपुर, सारा अली खान आणि उर्वशी रौतेला यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT