Brahmastra 2, 3 UPDATE Google
मनोरंजन

Brahmastra 2, 3 UPDATE: पहिल्या भागाला 8 वर्ष पण 'पार्ट 2 आणि 3 मात्र'.., रीलिज अपडेट देत अयान मुखर्जीनं दिला धक्का

अयान मुखर्जीनं सोशल मीडियावर पोस्ट करत 'ब्रह्मास्त्र पार्ट 2 आणि 3' कुठल्या साली आणि कुठल्या महिन्यात रिलीज होणार हे जाहिर केलं आहे.

प्रणाली मोरे

Brahmastra 2, 3 UPDATE: ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या सीरिज विषयी मोठी अपडेट दिली आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या भागानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केल्याचं दिसून आलं होतं. जवळपास ४३१ करोडचा गल्ला सिनेमानं जगभरातून कमावला होता.

पहिल्या भागात रिअल लाइफ कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसले अन् त्यांच्या जोडीला पसंतही केलं गेलं. 'ब्रह्मास्त्र 'हा सिनेमा अयान मुखर्जीनं स्वतः लिहिला देखील आहे. आलिया,रणबीरसोबतच 'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या भागात अमिताभ बच्चन,मौनी रॉय,नागार्जुन आणि शाहरुख खान यांच्या देखील भूमिका लक्ष वेधून गेल्या.

'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या भागाविषयी अयान एका मुलाखतीत म्हणाला होता की,''आम्हाला संमिश्र कमेंट्स मिळाल्या होत्या. खूप लोकांना सिनेमा आवडला होता. सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. ओटीटी वर सिनेमा जेव्हा आला तेव्हा देखील लोकांना तो आवडला होता. २०२२ मधील हिंदी सिनेमांमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा ब्रह्मास्त्र होता. मला अजूनही सिनेमावर लोकांनी केलेल्या टीका लक्षात आहेत''.

आता अयान मुखर्जीनं ब्रह्मास्त्र सिनेमा संदर्भात मोठी अपडेट देताना सिनेमाचा दुसरा आणि तिसरा भाग कधी रिलीज होईल याचा अंदाज दिला आहे.

याआधी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अयान म्हणाला होता की,''आम्ही ब्रह्मास्त्र पार्ट २ आणि पार्ट ३ एकत्रित चित्रित करणार आहोत. सिनेमांच्या स्क्रीप्टवर थोडा अधिक वेळ घेतला जाईल हे देखील तितकंच खरं आहे. सध्या ते काम सुरू आहे. मला माहित आहे लोकांना सिनेमाविषयी उत्सुकता आहे. ब्रह्मास्त्र पार्ट २ लगेच भेटीस यावा अशी अनेकांची इच्छा आहे. पण मला वाटतं आधी स्क्रीप्ट चांगली लिहायला हवी..कोणतीही तडजोड त्याबाबतीत करणार नाही. मला वाटतं आणखी तीन वर्षांनी आपण सगळे ब्रह्मास्त्र २ मोठ्या पडद्यावर पाहू शकतो''.

Brahmastra 2, 3 UPDATE

आता सिनेमाची अपडेट देताना अयान स्वतः एक नवी पोस्ट करत म्हणाला आहे की, ''आता वेळ आली आहे 'ब्रह्मास्त्र' विषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याची. लोकांनी 'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या भागाला दिलेलं प्रेम पाहता आता माझं पूर्ण लक्ष आणि ध्येय मी केंद्रित केलं आहे ते 'ब्रह्मास्त्र पार्ट २ आणि पार्ट ३' वर. पहिल्या भागापेक्षा नक्कीच हे दोन्ही भाग मोठे असतील. पहिल्या भागातून ज्या गोष्टी आम्ही शिकलो आहोत त्यानुसार आम्ही अधिक लक्ष आता स्क्रिप्ट्सवर देत आहोत''.

अयान पुढे म्हणाला की,''मी निर्णय घेतला आहे की आम्ही दोन्ही सिनेमे एकत्र बनवू..त्यामुळे त्यांच्या रिलीज डेटही जवळच्या असतील. रिलीजच्या वेळा मी निश्चित केल्यात ज्या तुमच्यासोबत शेअर करत आहे. अयाननं पोस्टमध्ये नमूद केलं आहे की 'ब्रह्मास्त्र पार्ट २' २०२६ रोजी आणि 'पार्ट ३' २०२७ रोजी रिलीज केले जातील.

अयाननं सांगितलं आहे की,''लवकरच तो सिनेमाच्या दिग्दर्शनाला सुरुवात करेल. देवानं मला खूप चांगली संधी दिली आहे खास सिनेमा दिग्दर्शित करायची. ही माझ्यासाठी केवळ संधी नाही तर त्यासोबत मोठी आव्हानही येणार आहेत ज्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 'ब्रह्मास्त्र'नं मला खूप गोष्टी शिकवल्या..त्यातनं मला उर्जा मिळाली..प्रोत्साहन मिळालं आणि मी हळूहळून पुढे गेलो. आता मी निश्चय केलाय याच्या नवीन आव्हानांचा स्विकार करायचा''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: महापालिका निवडणुकीत Gen Z ची एन्ट्री! नव्या विचारांची लाट येणार; मतदारांचा कल बदलणार का?

अजय अतुल यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालेलं आणि... असं तयार झालं 'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला' गाणं

Scorpio Horoscope 2026 : वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कसं असेल, आव्हान पेलण्याची ताकद निर्माण करा...

Indian Army SSC Tech 2026 : भारतीय सेनेत अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! कोणतीच परीक्षा नाही, कशी होणार निवड? पाहा संपूर्ण प्रक्रिया

Latest Maharashtra News Updates Live: जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रोड शोचे आयोजन

SCROLL FOR NEXT