Brahmastra First Weekend Box Office Collection  esakal
मनोरंजन

Brahmastra : पहिल्याच विकेण्डला 'ब्रह्मास्त्र'चं शतक, कमाई १०० कोटींपेक्षा अधिक

रणबीर कपूर आणि आलिय भट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा पहिल्याच आठवड्यात शतक

सकाळ डिजिटल टीम

Brahmastra Box Office First Weekend : ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटच्या ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, रविवारी चित्रपटाने सुमारे ३८-३९ कोटींचा गल्ला जमवला आहे.

'ब्रह्मास्त्र'ची १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री

बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या वीकेंडआधीच अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या ब्रह्मास्त्रने (Brahmastra Flim) आतापर्यंत देशभरात १०० कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, रविवारी चित्रपटाने सुमारे ३८-३९ कोटी कमावले आणि इतर ४ कोटी अन्य भाषांमधील व्हर्जनची कमाई आहे.

अशा प्रकारे या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जवळपास ४२-४३ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे पहिल्या वीकेंडमध्येच चित्रपटाने १०५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या वीकेंडला कोणत्याही सुटीशिवाय चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केल्याची ही ही मोठी गोष्ट आहे.

अयान मुखर्जीचा ५ वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट?

अयान मुखर्जी (Ayan Mukerji) दिग्दर्शित, ब्रह्मास्त्रने प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये १५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. स्टार स्टुडिओ आणि धर्मा प्रॉडक्शन या प्रोडक्शननुसार, 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा'चा दुसऱ्या दिवसाचा आकडा ८५ रुपये होता, एकूण कलेक्शन १६० कोटी रुपये झाला आहे. (Bollywood News)

अशा प्रकारे, अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट ओपनिंग वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरू शकतो. हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या वीकेंड कलेक्शनमध्ये ११-१२ कोटींच्या साऊथ बॉक्स ऑफिस कलेक्शनचीही भर पडली आहे.

जागतिक कमाई

'ब्रह्मास्त्र भाग एक : शिवा' मुळे थिएटर मालक आणि प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या चित्रपटाला देशभरातच नव्हे तर जागतिक बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय मिळत आहे. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर ६० कोटींची कमाई केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ब्रह्मास्त्रच्या परदेशातील कमाईत वाढ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT