Ranbir Kapoor Movie Brahmastra esakal
मनोरंजन

Brahmastra : राजामौलीनंतर रणबीरला मिळाली या मेगा सुपरस्टारची साथ, कारण...

रणबीरला राजामौलीनंतर या मेगा सुपरस्टारची मिळणार साथ

सकाळ डिजिटल टीम

Brahmastra Promotion News : रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रणबीर कपूर त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. करण जोहरच्या प्रोडक्शनमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे प्रमोशन रणबीर कपूर (Ranbir Kapoor) केवळ हिंदीतच नाही तर दक्षिणेतही करत आहे. त्याने साऊथमधून त्याच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे भव्य प्रमोशन सुरू केले आहे.

जिथे त्याला केवळ साउथ इंडस्ट्रीशी संबंधित दिग्दर्शकच नाही तर तिथल्या सुपरस्टार्सचाही पूर्ण पाठिंबा मिळत आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौलीनंतर आता साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असणार आहे.

ज्युनियर एनटीआर ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी

चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) शुक्रवारी त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करताना सांगितले होते की, 'ब्रह्मास्त्र'च्या प्री-रिलीजपूर्वी तो हैदराबादमध्ये एक भव्य कार्यक्रम करणार आहे. आता नुकतेच 'ब्रह्मास्त्र'च्या भव्य कार्यक्रमाला कोण ग्रँड गेस्ट असणार आहे, याचाही खुलासा त्याने एका पोस्टद्वारे केला आहे.

ब्रह्मास्त्रच्या (Brahmastra Movie) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही काळापूर्वी एक पोस्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये आधी रणबीर कपूर आणि नंतर ज्युनियर एनटीआरची जबरदस्त स्टाइल पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, 'मास स्टार ऑफ इंडियन सिनेमा' ज्युनियर एनटीआर ब्रह्मास्त्रच्या रिलीजपूर्वीच्या भव्य कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT