Ranbir and alia bhatt esakal
मनोरंजन

Brahmastra song teaser: 'केसरिया' आलिया - रणबीरचा रोमँटिक अंदाज

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलियाच्या (Alia Bhatt) लग्नाची चर्चा एकीकडे सुरु असतानाच दुसरीकडे त्यांच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाचे प्रेक्षकांना वेध लागले आहेत.

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलियाच्या (Alia Bhatt) लग्नाची चर्चा एकीकडे सुरु असतानाच दुसरीकडे त्यांच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाचे प्रेक्षकांना वेध लागले आहेत. त्या चित्रपटाचा टीझर (Bollywood News) नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी तो शेयर केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ब्रम्हास्त्रची चर्चा (entertainment news) आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे शुटींग पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर अनेकदा त्याच्या प्रदर्शनाच्या तारखाही बदलाव्या लागल्या होत्या. आता हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 14 एप्रिलला आलिया आणि (Bramhastra Movie) रणबीर हे विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी या दोन्ही सेलिब्रेटींवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ब्रम्हास्त्रमधील केसरियाच्या (Brahmastra song Kesariya) टीझरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अयान यांनी सोशल मीडियावरुन ब्रम्हास्त्रचा टीझर शेयर केला असून त्या पोस्टरमध्ये आलिया आणि रणबीरचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना भावला आहे. त्या पोस्टला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यांच्या त्या रोमँटिक पोझला केसरीयाचे बॅकग्राउंड म्युझिक असून ते नेटकऱ्यांना आवडले आहे. ते गाणं सध्याचा आघाडीचा गायक अरिजित सिंगनं गायलं आहे. ते पोस्टर शेयर करताना अयाननं एक कॅप्शनही लिहिलं आहे. त्यात तो म्हणतो, हे आमचं लव पोस्टर आहे. मला असं वाटलं की, आता आम्ही हे पोस्टर शेयर करण्याची अगदी योग्य वेळ आहे. सध्या प्रेमाचा माहौल आहे. आणि त्या वेळेचा फायदा घेण्याची ही योग्य संधी आहे. असा विचार करुन आम्ही हा टीझर प्रदर्शित केला आहे. आम्हाला खात्री आहे की, तो प्रेक्षकांना नक्की आवडेल. यासोबतच अयान यांनी त्या पोस्टमध्ये प्रीतम, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजीतचं नावही लिहिलं आहे.

रणबीर आणि आलियाच्या ब्रम्हास्त्रविषयी आणखी सांगायचे झाल्यास, त्यामध्ये बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, मौनी रॉय यांच्या भूमिका आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटामध्ये किंग खान शाहरुख आणि टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन हाही दिसणार आहे. मात्र त्याविषयी अद्याप निर्मात्यांकडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. यापूर्वी अनेकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून तो आता 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तो पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही निर्मात्यांच्यावतीनं सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT