Canada Theatre Owners receive threats of vandalism ahead of ponniyan selvan 1 realease controversy Google
मनोरंजन

'तर थिएटर्सच्या स्क्रीन्स फाडून टाकू..', कॅनडात ऐश्वर्याचा 'पोन्नियन सेल्वन' अडचणीत

कॅनडात थिएटर मालकांना धमक्या दिल्या जात आहेत की जर त्यांनी थिएटरमध्ये पोन्नियन सेल्वन I रिलीज केला तर सिनेमागृहात तोडफोड केली जाईल.

प्रणाली मोरे

Ponniyan Selvan 1 Controversy: मणिरत्नमचा पोन्नियन सेल्वन-1 ३० सप्टेंबरला रिलीज होतोय आणि रिलीजआधीच यावरनं मोठा वाद रंगला आहे. खासकरुन कॅनडामध्ये या सिनेमाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्याचं झालं असं की की कॅनडात (Canada) काही गटांमध्ये तामिळ सिनेमांप्रती राग आणि द्वेषाचं वातावरण पसरलं आहे. या कारणानं कॅनडात थिएटर मालकांना धमक्या दिल्या जात आहेत की जर त्यांनी थिएटरमध्ये पोन्नियन सेल्वन I रिलीज केला तर सिनेमागृहात तोडफोड केली जाईल.(Canada Theatre Owners receive threats of vandalism ahead of ponniyan selvan 1 realease controversy)

कॅनडात हेमिल्टन,किचनर आणि लंडन अशा कितीतरी ठिकाणी ३० सप्टेंबरला पोन्नियन सेल्वन I रिलीज होणार आहे. पण आता धमक्या मिळू लागल्याने तिथले थिएटर मालक बिचारे घाबरले आहेत. कॅनडामध्ये पोन्नियन सेल्वन I चे डिस्ट्रिब्युटर केडब्ल्यू टॉकीजनं ट्विटरवर एका मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की,''थिएटर मालकांना धमकी देणारे मेल येत आहेत,ज्यात बोललं जात आहे की सिनेमा रिलीज केला तर चांगलं होणार नाही,मोठा हंगामा होईल''.

शेअर केलेल्या स्क्रीनशॉट सोबत KW Talkies ने ट्वीटरवर लिहिलं आहे,''आम्हाला हेमिल्टन,किचनर आणि लंडन कडून अपडेट मिळाली आहे. सगळ्याच थिएटर मालकांना धमकी दिली गेली आहे की,जर त्यांनी आपल्या इथे पोन्नियन सेल्वन I या तामिळ सिनेमाला किंवा केडब्ल्यू टॉकीजच्या कोणत्याही सिनेमाला दाखवलं तर थिएटर्सची तोडफड केली जाईल''.

ट्वीटरवर ज्या मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला गेला आहे,त्यात लिहिलं आहे, ''सगळ्याच थिएटर मालकांना आणि कर्मचाऱ्यांना चेतावनी. जर तुम्ही केडब्ल्यू टॉकीजची 'पोन्नियन सेल्वन I' किंवा 'चुप' या सिनेमांना रीलिज करण्याचं प्लॅन करत असाल,तर तुमच्या स्क्रीनचे तुकडे-तुकडे केले जातील. तुमच्या काही कर्मचाऱ्यांची अवस्था अशी करु की त्यांना भेटायला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल''.

''आम्ही फक्त भारतीय सिनेमांना टार्गेट करत नाही तर हॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर सिनेमांची अवस्था देखील आम्ही तशीच करू. आणि आम्ही असं तोपर्यंत करत राहू जोपर्यंत तुम्ही केडब्ल्यूचे सिनेमे दाखवणं बंद करत नाही. ख्रिसमस जास्त दूर नाही. आम्ही हिंदी-इंग्लिश सगळ्या सिनेमांना टार्गेट करणार आहोत. लोकल थिएटर मालकांकडून काहीतरी शिका,त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी हे सिनेमे दाखवणं बंद केलं आहे. आणि ही तुमच्यासाठी अखेरची चेतावनी आहे''.

साऊथ सिनेमांप्रती कॅनडात वाढणारी नाराजी आणि राग खरंच चिंतेची बाब बनत चालला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये जेव्हा दलकर सलमानचा मल्याळम सिनेमा 'कुरुप' ओंटारियो मध्ये रिलीज झाला होता,तेव्हा तिथल्या थिएटरमधील स्क्रीनचे तुकडे-तुकडे केले होते. 'पोन्नियन सेल्वन -1' विषयी बोलायचं झालं तर ३० सप्टेंबर रोजी हा सिनेमा कन्नड आणि मल्याळम व्यतिरिक्त हिंदी भाषेतही रिलीज केला जाणार आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय-बच्चन,विक्रम, तृष्णा कृष्णनन,जयम रवि सारखे स्टार्स काम करताना दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT