Cannes 2023 Aishwarya Rai esakal
मनोरंजन

Cannes 2023 : 'ये बया हे काय गुंडाळून आली'! ऐश्वर्याचा ड्रेस पाहिल्यावर काय म्हणाल?

प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचा लूक आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. तिच्या त्या फोटोला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे.

युगंधर ताजणे

Cannes 2023 Aishwarya Rai Bachchan Silver dress : कान्सला सुरुवात झाली आहे. ज्या सोहळ्याची जगभरातील सेलिब्रेटी आतुरतेनं वाट पाहत असतात त्याची प्रेक्षकांमध्ये असणारी उत्सुकता मोठी आहे. भारतातील अनेक कलाकार या सोहळ्यामध्ये उत्साहानं सहभागी होत असल्याचे दिसून आले आहे. माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय आणि कान्स महोत्सवातील रेड कार्पेट यांचे नाते जुने आहे.

यंदाच्या कान्स सोहळ्यातील बॉलीवूडच्या तारकांचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. त्यावर नेटकऱ्यांच्या, चाहत्यांच्या कमेंटस भन्नाट आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचा लूक आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. तिच्या त्या फोटोला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्या रॉय ही कान्समध्ये लोकप्रियता मिळवत आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

यापूर्वी कान्समध्ये भारताकडून सुश्मिता सेन, प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या रॉय, सोनम कपूर या अभिनेत्रींनी सहभाग घेतला आहे. ऐश्वर्याचा सिल्व्हर आऊटफिट हा फोटोग्राफर्सचे लक्ष वेधून घेत होता. रेड कार्पेटवर ऐश्वर्या आली आणि फोटोग्राफर्सच्या नजरा तिच्याकडे वळल्या. वयाच्या २१ व्या वर्षी ऐश्वर्यानं पहिल्यांदा कान्सच्या महोत्सवामध्ये सहभाग घेतला होता. तेव्हापासून कान्सचे खास आकर्षण म्हणून ऐश्वर्याकडे पाहिले जाते.

ऐश्वर्याचा तो फोटो व्हायरल होताच चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. सोफीनं इंस्टावर ती पोस्ट शेयर केली आहे. अल्युमिनियम क्रिस्टल पेहरावात ऐश्वर्याचा तो लूक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

Gas Shortage: 'एचपी गॅस'कडून निवेदन; देशात गॅसची काय परिस्थिती? स्पष्ट सांगितलं

राजघराण्याशी संबंध, अनुभवी राजकारणी, भाजपचा प्रमुख चेहरा अन्...; महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मांचा राजकीय प्रवास काय?

Horoscope News : उद्या 11 मार्च बुधादित्य योगामुळे 6 राशींना मिळणार विशेष लाभ ! नव्या संधी आणि आर्थिक लाभ

महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! प्रसूती रजा वाढवली; अतिरिक्त अर्ध-पगारी सुट्टीही मिळणार, किती दिवसांची?

SCROLL FOR NEXT