The Pune police have registered a case against a film casting director for allegedly raping a female backstage artist
The Pune police have registered a case against a film casting director for allegedly raping a female backstage artist Google
मनोरंजन

पुण्यात कास्टिंग डायरेक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रणाली मोरे

बॅकस्टेजआर्टिस्ट(Backstage Artist) म्हणून काम करणाऱ्या एका महिला कलाकारावर कास्टिंग डायरेक्टरनं(Casting Director) बलात्कार(Rape) केल्याप्रकरणाची तक्रार पुणे(Pune) पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. गेली तीन वर्ष त्या महिलेवर हा अत्याचार होत आहे. ती महिला कलाकार त्यावेळी १७ वर्षांची होती. तिनं तक्रारीत म्हटलं आहे,'' त्या कास्टिंग डायरेक्टरनं जबरदस्तीनं आपल्याशी शारिरीक संबंध ठेवले होते. आपल्याला अनेकदा ब्लॅकमेल केलं गेलं असंही त्या महिला कलाकारानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे''. पुण्यात विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आपण आता २१ वर्षांचे झालो आहोत. १७ वर्षांचं असल्यापासून कास्टिंग डायरेक्टर आपल्यावर शारिरीक संबंधाची जबरदस्ती करत असल्याचं त्या तक्रारदार महिलेनं म्हटलं आहे. अत्याचार सहन न झाल्यानं त्या महिलेनं शेवटी आपल्या आई-वडिलांना त्याविषयी सांगितले. आणि मग तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. महिला कलाकाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे. तक्रारीची नोंद करत पोलिसांनी IPC Section 376(Rape) अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. अद्याप आरोपीला या प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही. पोलिस या प्रकरणात आधी सखोल चौकशी करणार असल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT