gaggubai kathiyavadi 
मनोरंजन

'गंगुबाई काठियावाडी' सिनेमा वादात, गंगुबाईच्या कुटुंबाने भंसाळी आणि आलियावर दाखल केली तक्रार

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित सिनेमा गंगुबाई काठियावाडीबाबत एक मोठी बातमी आहे. गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा वादाच्या भोव-यात सापडला आहे. गंगुबाईच्या कुटुंबाने सिनेमावरुन संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरोधात बॉम्बे सिविल कोर्टात केस दाखल केली आहे. या केसमध्ये गंगुबाईच्या कुटुंबाने सिनेमाच्या कथेवर आक्षेप घेतला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत असून हा सिनेमा रिअल लाईफ कथा असल्याने चर्चेत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हुसैन जैदी नावाच्या व्यक्तीने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरोधात २२ डिसेंबर रोजी खटला दाखल केला आहे. या प्रकरणावर ७ जानेवारी २०२१ पर्यंत भन्साळी आणि आलियाला उत्तर द्यावं लागणार आहे. हा सिनेमा प्रसिद्ध लेखक हुसैन जैदीयांच्या 'माफिया क्विन्स ऑफ मुंबई'वर आधारित आहे. सिनेमाचं शूटींग सुरु आहे. याचदरम्यान आता हा नवा वाद निर्मात्यांसाठी मोठी अडचण ठरु शकतो. 

गंगुबाई ६० च्या दशकातील मुंबई माफियामधील मोठं नाव होतं. असं म्हटलं जातं की त्यांच्या पतीने त्यांना केवळ ५०० रुपयांसाठी विकलं होतं. त्यानंतरच त्या वेश्या व्यवसायामध्ये गुंतल्या. या दरम्यान त्यांनी मजबुर असलेल्या मुलींसाठी खूप काम केलं. या सिनेमात गंगुबाईच्या मुख्य भूमिकेत आलिया भट्ट आहे. आलिया या सिनेमाच गँगस्चरच्या भूमिकेत झळकेल. आलिया पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकारणार आहे. तसंच ती पहिल्यांदाच भन्साळींसोबतत काम करणार आहे. गंगुबाई काठियावाडी सिनेमात अभिनेता अजय देवगणचा कॅमिओ असल्याचं देखील कळतंय.   

case registered against sanjay leela bhansali and alia bhatt for the film gangubai kathiawadi  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT