CBI Investigation Sameer Wankhede seeking 25 cr brib
CBI Investigation Sameer Wankhede seeking 25 cr brib 
मनोरंजन

Sameer Wankhede Case : आर्यन खानकडून २५ कोटी घेण्याचा वानखेडेंचा होता डाव! CBI ची धक्कादायक माहिती

सकाळ डिजिटल टीम

CBI Investigation Sameer Wankhede seeking 25 cr bribe : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अटक केली होती. आता वानखेडे यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. दुसरीकडे सीबीआयनं केलेल्या तपासातून मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्यन खानच्या प्रकरणात समीर वानखेडेंनी खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवर झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ज्या टीमनं ही कारवाई केली त्यात त्यांनी शाहरुख खानच्या मुलाला आर्यन खानला अटक केली होती. त्यावेळी या घटनेनं केवळ बॉलीवूडच नाहीतर देशभरामध्ये मोठी खळबळ उडाली होती. शाहरुखच्या मुलाला अटक झाल्यानं त्याच्या चाहत्यांनी तर किंग खानच्या घराबाहेर निदर्शनं केली होती.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आता सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे आणि त्यांचे अन्य तीन सहकारी यांचा आर्यन खानकडून तब्बल २५ कोटींची खंडणी घेण्याचा डाव होता. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. आर्यन खानला त्या प्रकरणातून सोडविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खंडणी घेण्याचा डाव होता अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे वानखेडे आणि त्यांचे अन्य सहकारी यांच्यापुढील प्रश्न आणखी गंभीर होणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयआरएस अधिकारी असलेले वानखेडे हे चेन्नईमध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहरुखच्या कुटूंबियांकडून ५० लाख रुपये आगाऊ रक्कम घेतल्याचे समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी त्या क्रुझवर झालेल्या घटनेनंतर ती क्रुझ सीझ करण्यात आली होती. आर्यन खानला अटक केल्यानंतर वानखेडे चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांची त्या केसवरुन बदली करण्यात आली होती.

सीबीआयनं आतापर्यत वेगवेगळ्या २९ ठिकाणांचा शोध घेतला असून त्यामध्ये मुंबई, दिल्ली, रांची, लखनौ, गुवाहाटी या ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणांहून त्यांनी वेगवेगळी कागदपत्रं, रोख रक्कम आणखी काही वस्तू जप्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : ''घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी...'', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update: पाकिस्तानचे झेंडे चालतील का? याचा बदला तुम्ही वीस तारखेला घ्या- एकनाथ शिंदे

Pune News : कात्रज घाटाचा मुख्य रस्ता खचल्याने धोका; भिलारेवाडी हद्दीत सातारा रस्त्यावरील घटना

Nashik Crime News: शरद पवार यांच्या सभेत 'हात की सफाई'! अज्ञाताने जिल्हाध्यक्षांच्याच गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली

SCROLL FOR NEXT