Cezanne Khan's alleged wife accuses him of domestic violence Kids are witnes kasauti zindagi ke SAKAL
मनोरंजन

Cezanne khan: मला खोलीत कोंडून त्याने.. कसौटी जिंदगी के मधील अभिनेत्यावर बायकोने केले गंभीर आरोप

सिजेन खानची पत्नी म्हणवणाऱ्या आयशा पिरानीने अभिनेत्याविरोधात FIR दाखल केला आहे

Devendra Jadhav

Cezanne Khan News: 'कसौटी जिंदगी की' मधून प्रसिद्ध झालेल्या सेझन खानवर नुकतेच आयेशा पिरानी नावाच्या महिलेने घरगुती हिंसाचार आणि खंडणीचा आरोप केला आहे.

स्वत:ला शीझान खानची पत्नी म्हणवणाऱ्या आयशा पिरानीने अभिनेत्याविरोधात FIR दाखल केला आहे आणि अनेक गंभीर आरोपही केले आहेत.

मात्र शीझान खानने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून महिलेच्या कोणत्याही दाव्यात आणि आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

(Cezanne Khan's alleged wife accuses him of domestic violence Kids are witnes kasauti zindagi ke)

(actor Cezanne khan wife's serious allegation kasauti zindagi ki)

काय आहेत आरोप?

आयशा पिरानीने शीझान खानवर फसवणूक केल्याचा आणि अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी तिचा वापर केल्याचा आरोप केला आहे.

आयशाने 7 जून रोजी शीझान खानविरोधात तक्रार दाखल करून 8 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. पण शीझान खानने तिच्यावरील सर्व आरोपांना 'बकवास' ठरवले आणि आयशाला वेड लागलंय असं विधान केलं.

नेमकं प्रकरण काय?

आयेशा आणि शीझानने २०१५ मध्ये लग्न केले होते. आयेशाच्या म्हणण्यानुसार, अभिनेता सीजनने हे लग्न गुपित ठेवण्यास सांगितले होते आणि नंतर अचानक घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली.

आयशाच्या आरोपांनुसार, शीझानने अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी तिचा वापर केला आणि तिची फसवणूक केली.

2013 ते 2016 या काळात तो तिच्यापासून वेगळा झाला होता. आयशा म्हणाली की, ती मुस्लिम आहे आणि मुस्लिम कायद्यानुसार तिचे अजून लग्न झाले आहे.

शीझान खानवर तिने आतापर्यंत खर्च केलेले सर्व पैसे तिला परत हवे आहेत. तो आणि त्याची मैत्रीण मला अश्लील व्हॉइस नोट पाठवत होत्या.

याशिवाय शीझान मला खोलीत बंद करायचा आणि इतर मुलांशी चॅटिंग करायचा, असा आरोप आयेशाने केलाय. माझ्या मुलांनी हे सर्व पाहीलंय.

शीझानचे म्हणणं काय?

News 18 ला दिलेल्या मुलाखतीत शीझान म्हणाला, 'ती जे काय म्हणाली आहे ते मुळीच खरे नाही. ती कशाबद्दल बोलत आहे हे देखील मला माहित नाही. FIR नोंदवण्यात आलेला नाही.

असे काहीही झालेले नाही. आजकाल कोणीही काहीही करू शकते. माझ्या हाती काहीच आले नाही. तिला वेड लागलंय. मला त्या बद्दल बोलायचे नाहीये. हा निव्वळ मूर्खपणा आहे.

असा खुलासा शीझानने केलाय. आता कथित बायको असली तरीही आयेशाच्या आरोपामुळे शीझानला अटक करण्यात येणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने भारताची चिंता वाढली! सेमीफायनलमधील शेवटच्या जागेसाठी न्यूझीलंडशी शर्यत; पाहा समीकरण

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्ध सामना कुठे फिरला, ज्यामुळे भारताचा झाला ४ धावांनी पराभव, हरमनप्रीत कौरने बोलून दाखवली मनातलं दु:ख

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT