Cham Cham Paus Ala Marathi Song Ankita Raut Harish Wangikar : सोशल मीडियावर सध्या एका मराठी गाण्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या गाण्याला नेटकऱ्यांचा प्रतिसादही मोठा आहे. पावसाळ्याच्या दिवसात आलेल्या छम छम पावसाच्या गाण्यानं चाहत्यांना निखळ आनंद दिला आहे. त्यावरील कमेंट्सही भन्नाट आहे.
कोळी गाण्यांची लोकप्रियता पुढ नेत अभिनेत्री 'अंकिता राऊत' आणि टक्सीडो फेम अभिनेता 'हरिश वांगीकर' यांचे बहुप्रतिक्षित 'छम छम पाऊस' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे संगीतकार, गीतकार आणि गायक हरिश वांगीकर असून या गाण्याचे संगीत संयोजक मॅक्सवेल फर्नांडीस आहे. तर गाण्याचे दिग्दर्शक कैलास पवार आहेत.
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
अविनाश पायाळ यानं या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. यात प्रसन्नाचं रॅप सॉंग देखील समाविष्ट आहे. गाण्याची विशेष बाब सांगताना मेकर्सनं म्हटले आहे की, पावसाचे दिवस असूनही हवा तितका पाऊस पडत नाही. या गाण्याचे चित्रिकरण हे प्रथमच आर्टिफिशियल पावसात करण्यात आले आहे. अशाप्रकारे 'छम छम पाऊस' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
गाण्याच्या प्रोसेसविषयी संगीतकार, अभिनेता हरिश वांगीकर सांगतो की, " एकदा पावसावरील गाणी ऐकत होतो. तेवढ्यात माझ्या प्ले लिस्टमध्ये एक गरब्याचं गाणं सुरू झालं आणि मला हे गाणं सुचलं. 'छम छम पाऊस' हे पावसावरील रोमँटिक गाणं आहे. आणि स्पेशली या गाण्याचं म्युझिक ट्रेडिशनली गरबा फॉर्ममध्ये आहे. तर या गाण्याचे बोल मराठी आहेत." पुढे तो सांगतो, "माझा मित्र अविनाश पायाळ याने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. अविनाश आणि अंकिता सोबत रिअर्सल करताना खूप धमाल आली.
अभिनेत्री अंकिता राऊत शुटिंगचा किस्सा शेअर करताना सांगते, "गाण्याची शुटिंग पुण्यातील एका सुंदर रिसॉर्टमध्ये होती. पहाटेचं शुट होतं. थोडा फार पाऊस पडला. आणि नंतर पाऊसच नव्हता. मग आम्ही आर्टिफिशियल पावसात संपूर्ण गाणं शुटं केलं. खरंतर आर्टिफिशियल पाऊस पडताना दाखवणं सोपं नाही. पण या गाण्याच्या टीमने फार मेहनत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.