SRK on Chandrayaan 3  
मनोरंजन

SRK on Chandrayaan 3 : "चांद तारे तोड लाऊँ..."; चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेनंतर शाहरुखची भन्नाट प्रतिक्रिया

सुपरस्टार शाहरुख खानच्या नावावर चंद्रावर जमीनही विकत घेण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर देशभरात भारताच्या वैज्ञानिकांचं आणि भारतीयांचं अभिनंदन होत आहे. भारतीयांनी देखील एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटिंनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये सुपरस्टार शाहरुख खान यानं देखील एकदम हटके पद्धतीनं प्रतिक्रिया दिली आहे. (Chand Tare Tod Lau SRK amazing reaction on sucess of Chandrayaan 3)

शाहरुखनं काय म्हटलंय?

शाहरुख खानच्या येस बॉस सिनेमात "चांद तारे तोड लाऊँ...सारी दुनिया पर मै छाऊँ" हे गाण प्रसिद्ध आहे. आपल्या या गाण्याच्याच ओळी त्यानं ट्विट केल्या आहेत. तसेच सर्व वैज्ञानिकांचं आणि इंजिनिअर्सचं अभिनंदनही केलं आहे. या सर्व टीमनं भारताला अभिमानाचा क्षण दिला आहे. (Latest Marathi News)

चंद्रावर शाहरुखच्या नावे जमीन

चंद्रावर शाहरुख खानच्या नावाची जमीन आहे याची तुम्हाला माहिती आहे का? चंद्र नोंदणीनुसार शाहरुख खानच्या मालकीचं चंद्रावर 'सी ऑफ ट्रँक्विलिटी' नावाचं एक क्षेत्र आहे, हे क्षेत्र त्याला भेट म्हणून दिलं जातं. दरवर्षी, एक ऑस्ट्रेलियन चाहता शाहरुखच्या वाढदिवशी चंद्रावर थोडी जमीन खरेदी करतो. एका मुलाखतीत, SRKनं याची माहिती दिली होती. (Marathi Tajya Batmya)

झी न्यूजशी बोलाताना त्यानं सांगितलं होतं की, “एक ऑस्ट्रेलियन महिला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्यासाठी चंद्रावर थोडी जमीन खरेदी करते. या खरेदीची प्रमाणपत्रं लुनार रिपब्लिक सोसायटीकडून मला मिळाली आहेत. ही महिला मला रंगीबेरंगी ई-मेल लिहिते. (यामध्ये एक ओळ लाल, एक निळी आहे)" असं शाहरुखनं सांगितलं आहे.

भारताची ऐतिहासिक कामगिरी

चांद्रयान २ च्यावेळी यानातील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करु शकला नव्हता. सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यानं लँडर क्रॅश झालं होतं. पण त्यावेळी झालेल्या चुकांमधून धडा घेत सुधारणा करत चांद्रयान ३ मोहिम राबवण्यात आली आणि ती यशस्वी ठरली. या मोहिमेतील विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भागात यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

SCROLL FOR NEXT