Chandu Champion  Esakal
मनोरंजन

Chandu Champion: कियारा क्रितीनंतर 'या' अभिनेत्रीसोबत कार्तिक करणार रोमान्स...

Vaishali Patil

Film Chandu Champion Actress: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा इंडस्ट्रीतील टॉप स्टार्समध्ये सामील झाला आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या छोट्या कारकिर्दीत बरेच हिट सिनेमे दिले आहेत.

त्याच्या क्रेझ ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्या चित्रपटाच्या कमाईचे आकडेही चांगले आहेत. कार्तिक आर्यन नुकताच 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात दिसला. ज्यात तो कियारा अडवाणीसोबत दिसला. त्यांची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यात आता कार्तिक आर्यनचा पुढचा चित्रपट 'चंदू चॅम्पियन' ची घोषणा नुकतीच झाली आहे. या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टरही नुकतचं रिलिज करण्यात आलं होतं.

आता कार्तिक आर्यनच्या नवीन चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. या चित्रपटात कार्तिक दिसणार हे तर पक्क होतं, मात्र त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री स्क्रिन शेयर करणार याचा खुलासा झालेला नव्हता. तर आता या चित्रपटाच्या लीड अॅक्ट्रेसचे नावाच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत.

आता कार्तिकच्या विरुद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर यात दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार श्रद्धा कपूरला या चित्रपटासाठी अधिकृतपणे साइन करण्यात आले आहे.

साजिद नाडियादवाला आणि कबीर खान 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीच्या शोधात होते. ते श्रद्धा कपूरसोबत काम करण्यास उत्सुक आहेत असं मिडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते.

( Kartik Aaryan film Chandu Champion)

कार्तिक आर्यन आणि श्रद्धा कपूरने स्क्रीन स्पेस शेअर केली आहे कार्तिक आर्यनने श्रद्धा कपूरच्या 'तू झुठी मैं मकर' या चित्रपटात कॅमिओ केला होता.

मात्र कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसला तर हे दोन्ही स्टार्स एकत्र चित्रपट करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

 (Chandu Champion Shraddha Kapoor)

कबीर खान दिग्दर्शित कार्तिक आर्यनचा पुढील चित्रपट 'चंदू चॅम्पियन' 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

'चंदू चॅम्पियन' हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटात चांगला VFX पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कबीर खानला आहे.

(Kartik Aaryan Movie)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT