Ruchira Jadhav 
मनोरंजन

Chhatrapati Shivaji Maharaj jayanti: "मुजरा फक्त महाराजांना!"; शिवजयंतीनिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीची खास पोस्ट

Chhatrapati Shivaji Maharaj jayanti: अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Chhatrapati Shivaji Maharaj jayanti: आज शिवजयंतीनिमित्त अनेक जण सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आहेत. अशातच आता अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टच्या माध्यमातून रुचिरानं बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) घरातील एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला.

रुचिरा जाधवची पोस्ट

रुचिरा जाधवनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसत आहे. या फोटोला रुचिरानं कॅप्शन दिलं, "शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, शिवजयंतीच्या निमित्ताने एक आठवण share कराविशी वाटते.Big boss च्या घरात असताना दर आठवड्याला Entertainment day च्या दिवशी कोणी ना कोणी पाहुणे येत असत. असंच एका Friday ला एक प्रतिष्ठित व्यक्ती आली होती, जी स्वतः कलाकार होती तसेच राजकारणाशी सुद्धा संबंधित होती.कार्यक्रम झाल्यावर त्यांना आदराने see off करताना आमच्यापैकी एकाने कोणीतरी “ए चला, त्यांना मुजरा करूया” असं म्हटलं. मग काय, सगळ्यांनी वाकून मुजरा केला. मी मात्र तशीच उभी होते."

"मला विचारलं, तू का मुजरा केला नाहीस, मी म्हटलं, “मुजरा फक्त महाराजांना” ! तत्व म्हणजे तत्व.दिखावा मला कधी जमला नाही आणि जमणार ही नाही आणि कोणासमोर झुकायचं, कोणासमोर नाही हेच जर कळलं नाही, तर काय शिकलो आपण महाराजांकडून.", असंही रुचिरानं पोस्टमध्ये लिहिलं.

रुचिराच्या मालिका

रुचिराच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रुचिरानं बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या चौथ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. तसेच तिनं माझ्या नवऱ्याची बायको,प्रेम हे,माझे पती सौभाग्यवती या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच सोबत,लकडाऊन,एपिलोग या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT