Chhavi Mittal  Google
मनोरंजन

ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या टी.व्ही अभिनेत्रीची प्रेरणादायी पोस्ट व्हायरल

छवी मित्तल एक प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच,पण सोबतच ती एक नावाजलेली युट्युबर देखील आहे.

प्रणाली मोरे

ब्रेस्ट कॅन्सर(breast cancer) हा महिलांमध्ये गेल्या काही वर्षात वाढलेला एक गंभीर आजार आहे. ज्याच्याशी लढा देताना अनेक महिलांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. पण अनेक महिलांनी ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजाराला नमवून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवातही केलेली आहे. यातच आता गेली अनेक वर्ष मालिका विश्वात काम करुन नाव कमावलेली आणि गेल्या काही वर्षात युट्युबर म्हणून प्रसिद्धिस आलेल्या अभिनेत्री छवी मित्तल(Chhavi Mittal)ला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची बातमी समोर आली आहे. टी.व्ही इंडस्ट्रीसाठी आणि छवीच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. छवीनं स्वतः आपल्या आजाराविषयी एक इमोशनल पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे.

छवी मित्तल एक प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच,पण सोबतच ती एक नावाजलेली युट्युबर देखील आहे. छवीचे व्हिडीओ आजपर्यंत अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यास कारणीभूत ठरलेले आहेत. लोकांना आपल्या व्हिडीओच्या माध्यातून हसवणाऱ्या छवीच्या आयुष्यातलं हसू मात्र कॅन्सरनं हिरावून घेतलं आहे. पण तरीही छवीच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. कॅन्सरशी लढा सुरू असताना तिनं सोशल मीडियावर एक भावूक पण प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून छवीनं लिहिलं आहे की,''ही पोस्ट खास अशा लोकांसाठी,माझ्या चाहत्यांसाठी आहे ज्यांनी मला आनंदी रहायची संधी दिली. ही तुमची जादू आहे ज्याचे आभार मानायला ही मी खास पोस्ट करीत आहे. आज मी ज्यांना कॅन्सरनं ग्रासलंय अशांसोबत उभी आहे. मला कॅन्सर झाला ही चांगली गोष्ट नाही झाली पण मी यातनं बरं होण्याची जिद्द सोडणार नाही. मी कदाचित पहिल्यासारखी दिसणार नाही. पण म्हणून माझ्याशी वेगळं वागण्याची गरज नाही. सगळ्या कॅन्सरपीडितांना चिअर्स. तुम्हाला नाही माहीत मला तुम्ही अनेकांनी खूप प्रेरणा दिली आहे. शेवटी छवीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,माझी प्रेमानं विचारपूस करणाऱ्या त्या सर्व मेसेजेच आणि कॉलसाठी धन्यवाद''.

छवी मित्तलनं 'कृष्णादासी', '३ बहुरानियॉं' आणि 'घर की लक्ष्मी बेटियॉं' अशा अनेक मालिकांमधून काम केलं आहे. छोट्या पडद्याच्या माध्यमातून आपलं नाव कमावल्यानंतर तिनं SIT नावाचा युट्युब चॅनल काढला. युट्युब व्हिडीओजच्या माध्यमातून छवीनं सगळ्यात जास्त प्रसिद्धि प्राप्त केली आणि लोकांचाी फेव्हरेट ब्लॉगर झाली. आपण सर्वच आशा करुया की छवी मित्तल कॅन्सरशी सुरु असलेल्या लढ्यात विजय मिळवेल आणि पुन्हा इंडस्ट्रीत दमदार पदार्पण करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT