remo 
मनोरंजन

ब्रेकिंग: प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुजाला हृदयविकाराचा झटका, कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आल्याचा माहिती समोर येत आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये रेमो डिसूजाची पत्नी लिजेलसोबत आहे. रेमोबाबतची ही माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रेमो डिसुजाला दुपारी हृदयविकाराचा झटका आला होता. उत्कष्ट कोरिओग्राफीसाठी प्रसिद्ध असलेल्या रेमो डिसुजाला फालतू आणि एबीसीडी सारख्या सिनेमांसाठी ओळखलं जातं. तो स्वतः डान्स ऍकॅडमी देखील चालवतो जिथे दरवर्षी युवा डांसर्सना प्रशिक्षण दिलं जातं. २ एप्रिल १९७२ मध्ये बंगळुरुमध्ये रेमोचा जन्म झाला. रेमो त्याच्या शालेय दिवसात एक उत्कुष्ट ऍथलेट होता. आणि त्यावेळी त्याने अनेक पुरस्कार देखील मिळवले होते. रेमोचं लग्न लिजेलसोबत झालं. लिजेल कॉस्च्युम डिझायनर आहे. रेमोला दोन मुलं असून त्यांच नाव ध्रुव आणि गबिरिल आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT