supreme court Sakal
मनोरंजन

Cinema Theatres : तंदुरी- जिलेबी अन्...; थिएटरमध्ये नेमकं काय नेता येणार? वाचा, SC काय म्हणालं

सिनेमागृहांमध्ये बाहेरील खाद्य पदार्थ परवानगी देणारा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Cinema Theatres : सिनेमागृहांमध्ये बाहेरील खाद्य पदार्थ परवानगी देणारा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द केला आहे.

सिनेमा हॉल ही व्यवस्थापनाची खाजगी मालमत्ता आहे, त्यामुळे येथे हॉल मालकाची मर्जी चालेल असे म्हणत सिनेमागृह म्हणजे जिम नव्हे जेथे जिथे ग्राहकांना पौष्टिक आहार मिळेल.

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले की, सिनेमा हॉल ही व्यवस्थापनाची खाजगी मालमत्ता असून येथे सिनेमागृहाच्या मालकाचीच मर्जी चालेल असे म्हटले आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने लहाना मुलांसह सर्वांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या आदेशाचा पुनरुच्चार केला.

ज्याप्रमाणे कोणत्या सिनेमागृहात जाऊन कोणता पिक्चर बघायचा हा सर्वस्वी प्रेक्षकांचा अधिकार आहे. त्याप्रमाणे तेथे कोणते नियम बनवायचे याचा सर्वस्वी अधिकार सिनेमागृह व्यवस्थापनाला आहे.

मात्र, प्रेक्षकांना थिएटरमध्ये मोफत शुद्ध पाणी देण्याचे आदेश यावेळी सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सिनेमा हॉल मालक प्रेक्षकांना स्वतःसोबत बाहेरील अन्नपदार्थ आणि पेये घेऊन जाण्यापासून रोखू शकतात, परंतु त्यांना शुद्ध पाणी मोफत देणे ही सिनेमागृह व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.

तसेच लहान मुलं किंवा नवजात बाळासाठी वाजवी प्रमाणात खाद्यपदार्थ आत नेण्याची परवानगी दिली पाहिजे असे निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने जम्मू-काश्मीर सिनेमा हॉल ऑनर्स असोसिएशनच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान नोंदवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT