City Of Dreams 3  
मनोरंजन

City Of Dreams 3 : गायकवाड कुटूंबियांचे काय होणार? 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या तिसऱ्या सीझनची घोषणा!

ओटीटी मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवली त्यामध्ये अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि प्रिया बापट यांच्या सीटी ऑफ ड्रीम्सचे नाव घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

City of Dreams Season 3 announced : ओटीटी मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवली त्यामध्ये अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि प्रिया बापट यांच्या सीटी ऑफ ड्रीम्सचे नाव घ्यावे लागेल. या वेबसीरिजच्या यापूर्वीच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्याचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या दोन सीझननंतर चाहत्यांना तिसऱ्या सीझनचे वेध लागले होते. डिझ्नी प्लस हॉटस्टार वर लोकप्रिय मालिका म्हणून सिटी ऑफ ड्रीम्स नेहमीच ट्रेडिंगचा विषय राहिली आहे. अशावेळी या मालिकेच्या तिसऱ्या सीझनच्या घोषणेनंतर चाहत्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. मेकर्सनं तिसऱ्या सिझनची घोषणा केली असून नव्या सीझनमधून आता पुन्हा गायकवाड कुटूंबियामध्ये काय होणार याची उत्सुकता आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रिया बापटनं या मालिकेमध्ये पौर्णिमा गायकवाडची भूमिका साकारली आहे. त्या भूमिकेनंतर प्रियावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिचे आजवरचे सर्वाधिक प्रभावी काम म्हणून तिची स्तूतीही केली आहे. सत्ता, संघर्ष, प्रेम, लोभ, द्वेष यासारख्या भावनांवर ही मालिका भाष्य करताना दिसते.

डिझ्नी हॉटस्टार या मालिकेच्या निर्मात्यांनी आता इंस्टावर एक पोस्ट शेयर करुन एक चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, गायकवाड कुटूंबियांचं महाराष्ट्रासोबतचं नातं अजून संपलेलं नाही. आता तिसऱ्या सीझनमध्ये खरं काय ते कळलेच. अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकूनर यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT