comedian kunal kamra
comedian kunal kamra  esakal
मनोरंजन

Kunal Kamra: 'चार चवन्नी घोडे पे, तुम्हारा गोडसे...' कुणाल कामराचं वादग्रस्त ट्विट

युगंधर ताजणे

Commedian Kunal Kamra: प्रसिद्ध स्टँण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा हा त्याच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहणारा सेलिब्रेटी आहे. त्यानं आजवर केलेल्या वक्तव्यांमुळे त्याच्यावर कित्येकदा गुन्हेही दाखल झाले आहे. आताही त्यानं नथुराम गोडसे यांच्याविरोधात केलेल्या ट्विटमुळे नव्या (entertainment News) वादाला सुरुवात झाली आहे. कुणाल कामराच्या कार्यक्रमांना विरोध करण्यात काही धार्मिक संघटना या नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. विश्व हिंदू परिषद हरियाणा येथील संघटनेनं त्याचा कार्यक्रम रद्द करावा असे निवेदन संबंधित जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर कुणाल कामरानं जे वक्तव्य केलंय ते व्हायरल झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून कुणाल हा त्याच्या स्टॅण्डअप कॉमेडियन प्रकारामुळे भललाच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. विशेषत तरुणाईचा कुणालला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. सोशल मीडियावर देखील कुणालला फॉलो करणाऱ्यांची संख्या आहे. राजकारण, समाजकारण, संस्कृती यासारख्या विषयावर तो व्यंगात्मक पद्धतीनं टीका करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतो. यात अनेकदा त्याच्या राजकीय वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

17 सप्टेंबरला गुरुग्रामध्ये कुणाल कामराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असा पवित्रा हरियाणातील विश्व हिंदू परिषदेनं घेतल्याचे दिसून आले आहे. त्यांनी गुरुग्रामच्या उपआयुक्तांना यासंबंधी एक निवेदन दिले असून त्यामध्ये कुणाल कामरा हा नेहमीच हिंदू देवतांवर टीका करतो. त्याची भाषा, वक्तव्यं ही प्रक्षोभक असल्यानं त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे त्या पत्रामध्ये म्हटले आहे. कुणालचा शो झाल्यास शहरामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते असेही त्या पत्रामध्ये म्हटले आहे.

हे पत्र व्हायरल होताच कुणालनं सोशल मीडियावर आपला राग व्य़क्त केला आहे. त्यानं ट्विटरवरुन आक्षेपार्ह शब्दांत नथुराम गोडसे यांच्याप्रती नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एका वेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. त्याचं ते व्टिट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होताना दिसत आहे. जर माझा कार्यक्रम कॅन्सलच होणार होता तर मग मन की बात ठासून सांगणं हे माझं काम आहे. असंही कुणाल म्हणाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT