Shyam Rangeela
Shyam Rangeela Esakal
मनोरंजन

Shyam Rangeela: मोदींची नक्कल करत नीलगायला खाऊ घालणं कॉमेडियन श्याम रंगीलाला पडलं महागात..जाणून घ्या प्रकरण..

प्रणाली मोरे

Shyam Rangeela: प्रसिद्ध स्टॅंड अप कॉमेडियन श्याम रंगीला मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करणं भारी पडलं आहे. श्यामं रंगीला, पी एम मोदींची हुबेहूब नक्कल करतो आणि त्यांच्यासारखा आवाजही काढतो.

काही दिवसांपूर्वीच श्याम रंगीलानं जयपूरच्या झालाना जंगलात जाऊन एका नीलगायला खायला दिलं. त्यानंतर त्यानं पंतप्रधान मोदींची नक्कल करत व्हिडीओ बनवत तो व्हायरल केला. या व्हिडीओवरनं वाद रंगला आहे. वनविभागानं आता श्याम रंगीलाला नोटीस पाठवली आहे. यावर श्याम रंगीलाची रिअॅक्शन आली आहे.

श्याम रंगीला याला ही नोटीस क्षेत्रीय वन अधिकाऱ्यांनी पाठवली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी टायगर प्रोजेक्टला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कर्नाटकच्या मुदुमलाई आणि बांदीपुर टायगर रिझर्व्ह दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान त्यांनी डोक्यात हॅट घातली होती आणि हातात दुर्बिण होती. श्याम रंगीलानं पीएम मोदी यांच्या याच दौऱ्याला समोर ठेवून झालाना जंगलाची ट्रीप आयोजित केली होती.(comedian shyam rangeela how shot video with pm narendra modi mimicry slapped with notice ppm81)

श्याम रंगीला १३ एप्रिलला जयपुर स्थित झालाना जंगलात लेपर्डच्या सफारीसाठी गेला होता, यादरम्यान त्यानं तसेच कपडे घातले जसे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कर्नाटक सफरी दरम्यान परिधान केले होते. तिथे श्याम रंगीलानं पंतप्रधानांची नक्कल करत नीलगायला खायला दिलं आणि व्हिडीओ बनवला.

त्यानंतर श्याम रंगीलानं व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. श्याम रंगीलानं सफारीतून उतरत नीलगायला खायला दिलं आणि व्हिडीओ बनवला,जे रिझर्व्हच्या नियमां विरोधात होतं. यापद्धतीनं नीलगायला खायला देणं वन अधिनियम १९५३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियनम १९७२ च्या नियमांचे उल्लंघन आहे.

क्षेत्रीय वनाधिकाऱ्यांनी सांगितलं की वन्य जीवांना खाण्या-पिण्याच्या गोष्टी खायला दिल्यानं त्यांना गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो तसंच त्यांच्या जीवाला धोका देखील होऊ शकतो. त्यामुळे तिथे झालाना जंगलात जागोजागी यादंर्भात सूचना फलक लावलेले आहेत. यावर स्पष्ट शब्दात सूचित केलं आहे आहे की वन्यजीवांना काहीही खायला देऊ नये.

या संपूर्ण प्रकरणावर श्याम रंगीलाची देखील प्रतिक्रिया आली आहे. त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिलं आहे,''हे नीलगाय,जेव्हा तू घाबरून इकडे-तिकडे जाऊ पाहत होतीस तेव्हा मोदीजींच्या आवाजात मी तुला बोलावल्यावर तू धावत माझ्याकडे आली होतीस. त्यावेळी तुला देखील लक्षात आलं होतं की हा ५६ इंचाचा नाही तर ५६ किलोचा कोणीतरी आहे. हे नीलगाय मी तुला काहीतरी खाऊ घातलं होतं, याबद्दल क्षमा कर मला, पण मी तेव्हा रंगीला नव्हतो''.

श्याम रंगीला एक कॉमेडियनच नाही तर आम आदमी पार्टीचा सदस्य आहे. तो राजस्थानच्या हनुमान गढंचा राहणारा आहे. श्याम रंगीलाचं शिक्षण १२ वी पर्यंत झालं आहे आणि त्यानं अॅनिमेशनचा कोर्स देखील केला आहे.

श्याम रंगीलाला लहानपणापासून कॉमेडियन व्हायचं होतंय या स्वप्नासोबत तो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मध्ये देखील दाखल झाला होता. श्याम रंगीला राहुल गांधींची देखील नक्कल करतो.

श्याम रंगीलाचं फॅन फॉलोइंग तगडं आहे. लाखो लोकांना श्याम रंगीलाची पंतप्रधान मोदींची मिमिक्री अधिक पसंत येते. इन्स्टाग्रामवर देखील श्याम रंगीलाचे १३०K फॉलोअर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT