Ranbir Kapoor And Alia Bhatt wedding confirmation Images
मनोरंजन

आलिया-रणबीरच्या कुटुंबियांकडून अखेर लग्नाचं पहिलं कन्फर्मेशन समोर

आलिया-रणबीर यांच्या लग्नाविषयी त्या दोघांनीच नाही, तर कुटुंबानेही गेल्या काही दिवसांपासून चुप्पी साधली होती.

प्रणाली मोरे

सध्या बॉलीवूडच्या कुठला मोठा विषय चर्चेत असेल तर ते रणबीर(Ranbir Kapoor)-आलियाचं(Alia Bhatt) लग्न. सगळ्यांना प्रतिक्षा आहे ते या दोघांच्या लग्नसोहळ्यातील सुंदर-सुंदर फोटो पाहण्याची. अर्थात रणबीर-आलियापासून त्यांच्या कुटुंबियांनीही या विवाहसोहळ्याविषयी चुप्पी साधली होती. पण आता सर्वात पहिलं या लग्नाविषयीचं कन्फर्मेशन समोर आलं आहे आणि ते चक्क आलियाचे काका रॉबिन भट्ट (Robin Bhatt) यांनी दिलं आहे. रणबीर-आलिया पुढील आठवड्यात लग्न करत आहेत असं ते म्हणाले आहेत. एका मनोरंजनविषयक बातम्या करणाऱ्या पोर्टलशी बोलताना ते म्हणाले आहेत,''रणबीर-आलियाचा लग्नसोहळा चार दिवस रंगणार आहे. लग्न आर.के हाऊसमध्ये होणार असल्याचंही त्यांनी कन्फर्म केलं आहे''.

रॉबिन यांनी इंडिया टूडेला दिलेल्या माहितीनुसार त्यांना भट्ट कुटुंबियांकडून लग्नाचं निमंत्रण पोहोचलं आहे. रॉबिन भट्ट हे महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचे चुलत भाऊ आहेत. अतिशय मोजक्याच आप्तेष्टांच्या-मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हे लग्न होणार आहे. रणबीरनं लग्नाआधी बॅचलर पार्टीचंही आयोजन केलं आहे,ज्यात बॉलीवूडमधनही त्याचा काही खास मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे. यात अयान मुखर्जी,अर्जुन कपूर,आदित्य रॉय कपूर अशी नावं समोर आली आहेत. रणबीर-आलिया बॉलीवूडकरांसाठी खास रीसेप्शन लग्नानंतर ठेवणार आहेत. शाहरुख खान ते करण जोहर आणि आदित्या चोप्रा ते संजय लीला भन्साली ते अगदी रणवीर सिंग अशा सर्वांना रीसेप्शनचं निमंत्रण गेलं आहे. आलिया-रणबीर यांनी एकत्रित काम केलेल्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या प्रदर्शनाची देखील चाहते त्यांच्या लग्नाइतकीच चातकासारखी वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

Pune News : शेतकऱ्यांच्या १२ कोटींच्या मोबदल्यावरून महापालिकेची नामुष्की; आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई टळली

PMC News : पुणे महापालिका भाडेतत्त्वावर घेणार २५० घंटागाड्या; कचरा संकलन व्यवस्था होणार अधिक सक्षम

Flood News : कोरेगाव मुळ बंधाऱ्यावरून दुचाकीसह ज्येष्ठ वाहून; एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

Pune News : ‘आर्किटेक्ट’ पदवीचा बेकायदेशीर वापर महागात; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा कठोर इशारा

SCROLL FOR NEXT