Bharat Jodo Yatra Esakal
मनोरंजन

Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत छोट्या पडद्यावरील कलाकारही सामील

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. आज महाराष्ट्रात आज या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. हा प्रवास सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.

आतापर्यंत राजकीय आणि सामाजिकच नव्हे तर मनोरंजन जगतातील अनेक कलाकारांनी राहुल गांधींच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे, ज्यात पूजा भट्ट, सुशांत सिंग आणि रिया सेन,स्वरा भास्कर यांसारख्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. आता यात्रेत टिव्ही कलाकार आणि  बिग बॉस फेम रश्मी देसाई आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी याही सामील झाल्या आहे.

या दोन्ही अभिनेत्रींचा राहुल गांधींसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काँग्रेसने स्वतः आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर केला आहे. फोटोंमध्ये राहुल गांधींसोबत आकांक्षा पुरी आणि रश्मी देसाई एकत्र दिसत आहेत. या फोटोसोबत काँग्रेस पक्षाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी आमच्या सत्याच्या लढाईत सहभागी झाल्या आहेत.' काँग्रेसच्या या पोस्टला अभिनेत्रीनिंही रिट्विट केले आहे. रश्मी देसाईनेही तिच्या सोशल मिडियावर है व्हिडिओ शेअर केला आहे.

या दोघींच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रश्मी देसाई हि छोट्या पडद्यावरील 'उतरन' या मालिकेतून घराघरात पोहचली. याशिवाय ती बिग बॉस रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. तर आकांक्षा पुरीही अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. नुकतीच ती 'मिका दी वोटी'मध्येही दिसली होती. या शोमध्ये तिने सर्वांना मागे टाकत विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

'एआय' आणी सर्जनशीलतेला धोका

SCROLL FOR NEXT