देशभरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चित्रपटसृष्टीतील आमिर खान, आर. माधवन, सतीश कौशिक, परेश रावल यांसारख्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्याही घरी कोरोना पोहोचला आहे. 'स्पॉटबॉय ई'ने दिलेल्या वृत्तानुसार, महेश बाबूच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. ड्रायव्हरच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येताच महेश बाबूच्या पत्नीने खबरदारीचा उपाय म्हणून कुटुंबातील सर्वांची कोरोनाची चाचणी केली. नम्रता शिरोडकरने पुढाकार घेत महेश बाबूसह कुटुंबातील अन्य व्यक्तींचीही कोरोना चाचणी करून घेतली. सुदैवाने सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असून योग्य ते नियम पाळत असल्याची माहिती समोर येत आहे.
महेश बाबूने शूटिंगपासून घेतला ब्रेक
गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे अनेक चित्रपटांचे शूटिंग रखडले होते. मात्र जसजसे निर्बंध शिथिल करण्यात आले, तसतसे शूटिंग पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आले. महेश बाबूनेही त्याच्या आगामी 'सरकारू वारी पाटा' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. मात्र सध्या त्याने शूटिंगपासूनही ब्रेक घेतल्याचं कळतंय. मुलगी सितारा आणि मुलगा गौतम यांना तो वेळ देत आहे. मुलांसोबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
लसीकरणाचा तिसरा टप्पा १ एप्रिलपासून
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला १ एप्रिलपासून लस देण्यात येणार आहे. कोविड १९ लसीकरण मोहिमेच्या कक्षेत अधिकाधिक लोकांचा समावेश करण्याची योजना केंद्र सरकार आखत असल्याचं शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं. देशात गेल्या एका दिवसात आणखी ५९ हजार ११८ जणांना कोरोनाची लागण झाली असून या वर्षीचा (एका दिवसात लागण होण्याचा) उच्चांक आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ वर पोहोचली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.