Crazy Fans enters in ankit tiwari house threatens to self harm if singer does not meet  Google
मनोरंजन

Viral Video: अंकित तिवारीच्या घरी घुसला चाहता, पुढे जे घडलं त्यानं 'तेरी गलियां' फेम सिंगर धक्क्यात

बॉलीवूड सिंगर अंकित तिवारीला आलेला क्रेझी चाहत्याचा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हिडीओच्या रुपात जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Viral Video: सेलिब्रिटी आणि त्यांच्या कामाप्रती चाहत्यांचे वेड काय टोकाचं असतं हे आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल किंवा अनुभवलं देखील असेल. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडचा सिंगर अंकित तिवारीला देखील त्याच्या एका चाहत्याचा भयानक अनुभव आलेला आहे. 'तेरी गलियां' फेम सिंगर अंकित तिवारी राहत असलेल्या इमारतीत त्याचा एक क्रेझी चाहता अचानक घुसला. सुरक्षा रक्षकांनी या चाहत्याला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण त्या चाहत्याला काहीही झालं तरी अंकितला भेटायचा ध्यास लागला होता. (Crazy Fans enters in ankit tiwari house threatens to self harm if singer does not meet)

जवळपास ३० मिनिटांपर्यंत सुरक्षारक्षकानं चाहत्याला थांबवण्याचा आणि समजावण्याचा कसून प्रयत्न केला पण चाहता काही ऐकेना त्यानं जोर-जोरात ओरडायला सुरुवात केली आणि कुणी आपलं ऐकेना हे पाहता त्यानं हाताची नस कापून घेण्याची धमकी दिली. शेवटी अंकित तिवारीला आपल्या त्या क्रेझी चाहत्याला भेटायला यावेच लागले. अंकितला पाहताच तो चाहता थेट त्याच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला. जेव्हा अंकितनं त्याला अलिंगन देत समजावलं तेव्हा तो चाहता तिथून जायला तयार झाला.

अंकित तिवारीला याविषयी विचारताच तो म्हणाला, ''तो अनुभव माझ्यासाठी शॉकिंग होता. एक गायक म्हणून मी जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा मी अनेक लोकांना भेटतो. पण हा अनुभव खरंच खूप वेगळा होता. त्या चाहत्यानं काही अशा गोष्टी केल्या ज्यानं मला धक्का बसला होता. तो मला भेटण्याच्या इच्छेपोटी स्वतःला नुकसान करू पाहत होता. धमक्या देत होता,हाताची नस कापून घेईन म्हणत होता''.

अंकित तिवारी पुढे म्हणाला,''त्यावेळी माझ्याकडे फक्त दोन पर्याय होते. एक मी पोलिसांना बोलवावं आणि दुसरं स्वतः खाली जाऊन त्याला भेटावं म्हणजे सगळं प्रकरण निवळेल. मी त्यातला दुसरा पर्याय निवडत चाहत्याला भेटायला खाली गेलो आणि भेटलो''. 'तुला भिती वाटत होती का?' असं विचारल्यावर अंकित म्हणाला, ''नाही,मला आधी भिती मुळीच वाटली नाही,पण जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा मी घाबरलो होतो''. अंकित तिवारीचा चाहत्यासोबत झालेला हा आमना-सामना सध्या सोशल मीडियावर लोकांचे मात्र भरपूर मनोरंजन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT