Cuttputlli rights sold to crores deal,film stream on ott platform disney hotstar Google
मनोरंजन

बाबो! अक्षय की तो निकल पडी, 'कठपुतली'चे ओटीटी राइट्स इतक्या कोटींना विकले..

'कठपुतली' एक साइकोलॉजिकल थ्रिलर आहे, ज्यामध्ये कसौलीच्या एका पोलिस ऑफिसरची कथा मांडण्यात आली आहे.

प्रणाली मोरे

Cuttputlli OTT Rights: अक्षय कुमार(Akshay Kumar) एक असा अभिनेता आहे जो दोन सिनेमांमध्ये ब्रेक अभावानेच घेतो. अक्षय कुमारजवळ आताही अनेक सिनेमे पाइपलाइनमध्ये आहेत. अक्षयच्या 'कठपुतली' सिनेमाची देखील आता चर्चा जोरदार रंगली आहे. 'कठपुतली' एक साइकोलॉजिकल थ्रिलर आहे, ज्यामध्ये कसौलीच्या एका पोलिस ऑफिसरची कथा मांडण्यात आली आहे. अक्षय कुमार या सिनेमात अर्थातच मध्यवर्ती भूमिका साकारत आहे, सिनेमाचं दिग्दर्शन रंजीत एम तिवारीनं केलं आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. हा सिनेमा डिस्ने प्ल्स हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.(Cuttputlli rights sold to crores deal,film stream on ott platform disney hotstar)

रिलीज आधीच या सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगली आहे. डिस्नेप्लस हॉटस्टारने या सिनेमाच्या मेकर्सना तगडी रक्क्म ऑफर केली आहे. रिपोर्ट्सनुसार ओटीटी प्लॅटफॉर्मने या सिनेमाचे राइट्स खरेदी केले आहे, ते देखील तब्बल १२५ करोडोंना. एका वेबसाईटला मिळालेल्या अंतर्गत माहितीच्या आधारे कळत आहे की,अक्षय कुमारचा हा सिनेमा सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,बॉक्सऑफिसवर सध्या अक्षयचे सिनेमे चांगला बिझनेस करत नसल्यानं निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,'कठपुतली' च्या मेकर्सनी निर्णय घेतला की ते हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज करतील. अशात डिस्ने प्लस हॉट स्टारसोबत त्यांची डील फायनल झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सिनेमा रिलीज होणार आहे. डिस्नेनं १२५ करोडोची ऑफर कठपुतलीच्या मेकर्सना दिली आहे. आताची बॉक्सऑफिसची परिस्थिती पाहिली तर ही मोठी ऑफर समजली जात आहे.

अक्षय कुमारचं वर्क कॅलेंडर पाहिलं तर २०२२ सालात ते फुल्ल टाईट आहे. अक्षय कुमार ब्लॉकबस्टर तामिळ सिनेमा Soorarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये काम करत आहे. अक्षय लवकरच आपल्या चर्चेत राहिलेल्या आणि लोकांनी पसंत केलेल्या जॉली एलएलबी च्या भूमिकेतही लवकरच दिसणार आहे. जॉली एलएलबी ३ च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होतेय. याव्यतिरिक्त अक्षय कुमारकडे रामसेतु,सेल्फी,ओह माय गॉड २, गोरखा, कॅप्सूल गिल असे सिनेमे आहेत. भले अक्षयसाठी २०२२ साल चांगले राहिले नाही पण आता नव्या वर्षाकडे त्यानं नजर खिळवली आहे,अन् देव करो आणि त्याला उत्तम साथ मिळो नव्या वर्षाची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT