Danny Masterson found guilty in rape case Instagram
मनोरंजन

Rape Case: बलात्काराच्या प्रकरणात 'या' हॉलीवूड अभिनेत्यावरील गुन्हा सिद्ध.. होऊ शकते इतक्या वर्षांची शिक्षा..

डॅनी मास्टरसनवर तीन बलात्काराच्या केस दाखल झाल्या होत्या.

प्रणाली मोरे

Danny Masterson: अमेरिकन अभिनेता डॅनी मास्टरसन याला लॉस एंजेलिसच्या एका कोर्टानं बुधवारी ३१ मे रोजी तीन पैकी दोन बलात्काराच्या प्रकरणात दोषी करार दिला आहे. 70s Show अभिनेता मास्टरसनला दोषी करार दिल्यानंतर हातात बेड्या ठोकून कोर्टातनं तुरुंगात नेण्यात आलं. त्याला या प्रकरणात म्हणे ३० वर्ष शिक्षा होण्याची शक्यता आहे.

सात महिला आणि पाच पुरुषांच्या ज्युरीनं दोन आठवडे पूर्ण विचार विनिमय करुनच हा निर्णय दिला आहे. ४७ वर्षीय डॅनियल याच्यावर त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेमिकेनं लावलेल्या आरोपावर अद्याप ज्युरींनी आपला निर्णय दिलेला नाही.

यासंदर्भात मास्टरसनच्या प्रवक्त्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा त्यानं यावर बोलण्याचे टाळले. मास्टरसनचे वकील कोर्टाच्या या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात अपील करतील असं बोललं जात आहे.

मास्टरसनची शिक्षा जाहिर होईपर्यंत त्याला जमानत मिळणार नाही, अद्याप शिक्षेच्या सुनावणीची तारीख जाहीर केलेली नाही. पण न्यायाधीशांनी मास्टरसन आणि त्यांच्या वकीलांना सुनावणीसाठी ४ ऑगस्टला कोर्टात येण्याचे आदेश दिले आहेत.

मास्टरसनच्या केसची सुनावणी होत असताना त्याची पत्नी अभिनेत्री बिजोऊ फिलिप्स देखील कोर्टात हजर होती. मास्टरसनला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा तिचे डोळे डबडबले होते. सुनावणी दरम्यान उपस्थित असलेलं मास्टरसनचं कुटुंब आणि मित्रपरिवार हा निर्णय ऐकून स्तब्ध झाले.

डॅनी एक अमेरिकन अभिनेता आहे ज्यानं 'मॅन अॅट वर्क', 'हंग ज्यूरी', 'द रांच' ते स्टीडन ह्येड थेट्सच्या '70s' शो मध्ये देखील तो दिसला आहे. अभिनेत्यानं बिजोऊ फिलिप्ससोबत २०११ साली लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगी आहे. अभिनेत्यावर २०१७ साली लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT