Vindu Dara Singh, Vindu Dara Singh birthday, Vindu Dara Singh controversy, dara singh SAKAL
मनोरंजन

Vindu Dara Singh Birthday: हनुमान साकारणाऱ्या दारा सिंगचा मुलगा मात्र खऱ्या आयुष्यात 'रावण' निघाला

जो मान - सन्मान दारा सिंग यांना आयुष्यभर मिळाला तो आदर मात्र त्यांच्या मुलाला कमावता आला नाही.

Devendra Jadhav

Vindu Dara Singh Controversy News: आजही हनुमान उच्चारलं तर समोर येतात ते दारा सिंग.

दारा सिंग यांनी पिळदार शरीरयष्टी, दमदार आवाज आणि उत्कृष्ट अभिनय अशा गोष्टींचा वापर करून हनुमान अजरामर केला.

जे यश, जो मान - सन्मान दारा सिंग यांना आयुष्यभर मिळाला तो आदर मात्र त्यांच्या मुलाला कमावता आला नाही.

उलट मुलाने मात्र वडिलांच्या नावाला काळिमा लागेल अशीच कामं केली. आज दारा सिंग यांचा मुलगा विंदू दारा सिंग यांचा वाढदिवस.

(dara singh son vindu dara singh birthday major controversy on his life)

1 मे 1964 रोजी जन्मलेल्या विंदू दारा सिंग यांनी 1994 मध्ये 'करण' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

यानंतर त्यांनी 1996 मध्ये पंजाबी चित्रपट 'रब दिया रक्खा' मध्ये काम केले. विंदू पंजाबीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये साईड रोल करताना दिसले.

तो बिग बॉस 3 चा विजेता देखील बनला होता. अनेकदा बिग बॉस मुळे सेलिब्रिटींचं करियर सुसाट सुरु होतं. पण विंदूच्या बाबतीत मात्र तसे झाले नाही.

मॅच फिक्सिंग प्रकरणात झाली अटक

2013 हे वर्ष विंदू दारा सिंगसाठी वाईट ठरले, कारण याच काळात त्याचे नाव आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात आले.

यासाठी त्याला पोलिसांनी अटकही केली होती, मात्र त्याचवेळी त्याला स्थानिक न्यायालयातून जामीन मिळाला होता.

सेक्स रॅकेटमध्ये सापडला

विंदू दारा सिंगचे नाव केवळ मॅच फिक्सिंगमध्येच नाही तर सेक्स रॅकेटमध्येही आले आहे. त्याच्यावर आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटशी संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

त्यावेळी पोलिसांना काही फुटेज मिळाले होते ज्यात विंदू कझाकिस्तानमधील मुलींसोबत दिसत होता.

वादग्रस्त ठरलेलं वैयक्तिक आयुष्य

विंदू दारा सिंहने अभिनेत्री तब्बूची बहीण फराह नाज हाश्मीसोबत लग्न केले होते. फराह नाज 80 आणि 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती.

नसीब अपना अपना, भाई हो तो ऐसा घर घर की कहानी, इमानदारी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

विंदू दारा सिंह आणि फराह यांचं लव्ह मॅरेज होतं. दोघांनी 1996 मध्ये कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले आणि दोघांना एक मुलगाही झाला.

मात्र, त्यानंतरही हे लग्न टिकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर विंदूने मॉडेल डायन उमरोवासोबत लग्न केले आणि त्यांना एक मुलगीही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT