Debina Bonnerjee infected with influenza b virus shares report and symptoms Instagram
मनोरंजन

T.V Actress देबीनाला 'इन्फ्लुएंझा बी' ची लागण.. मुलींपासून रहावं लागतंय दूर..आजाराची लक्षणं सांगत म्हणाली..

टी.व्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लोकांना इन्फ्लुएंझा बी व्हायरस विषयी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

प्रणाली मोरे

Debina Bonnerjee infected with influenza b virus: टी.व्ही अभिनेत्री देबीना बॅनर्जीला इन्फ्लुएंझा बी व्हायरसची लागण झाली आहे. तिनं ही माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिली आहे.

देबीनानं लिहिलं आहे की, ''आईची जबाबदारी सांभाळणं खूप कठीण असतं. व्हायरसची लागण झाल्यानंतर तिला दोन्ही मुलींपासून लांब राहावं लागत आहे''.

देबीनानं काही दिवसांपूर्वीच आपल्या मुली लियाना,दिविशा आणि पती गुरमीत सोबत श्रीलंकेत व्हॅलंटाईन डे साजरा केला होता.

तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं होतं की तिच्या मुलींची ही पहिली इंटरनॅशनल ट्रीप होती. (Debina Bonnerjee infected with influenza b virus shares report and symptoms)

देबीनानं इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या टेस्ट रिपोर्टविषयी माहिती दिली आहे की तिला इन्फ्लुएंझा बी व्हायरसची लागण झाली आहे. तिची तब्येत सध्या बरी नसून ती मुलींपासून लांब राहतेय. याची लक्षणं तिनं ताप आणि खोकला असल्याचं सांगितलं आहे.

देबीनाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ''देबीना या आजारातून आता बरी होत आहे. या आजारात जी काही काळजी घेणं गरजेचं आहे,ते ती घेत आहे''

''डाएट प्लॅन फॉलो करत हेल्दी फूड खातेय आणि या गोष्टीवर लक्ष ठेवतेय की ती आपल्या मुलींपासून लांब राहील जेणेकरून त्यांना व्हायरसची लागण होऊ नये''.

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

गुरमीत आणि देबीना यांच्यासाठी २०२२ हे वर्ष खूप चांगलं राहिलं. एप्रिलमध्ये तिनं तिची पहिली मुलगी लियानाला जन्म दिल्यानंतर ती लगेच दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिली होती. आणि नोव्हेंबरमध्ये तिनं तिच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. तिची दुसरी मुलगी प्रींमॅच्युर होती. तिची खूप काळजी घ्यावी लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT