Debina bonnerji birthday know why actress gave birth two child in a year gurmeet chaudhary Instagram
मनोरंजन

Debina Bonnerji: एका वर्षात दोनदा आई बनण्याचा निर्णय का घेतला होता देबिनानं?..पती गुरमितचं नाव घेत केलेला खुलासा

देबिनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मुलीमध्ये फक्त सात माहिन्याचं अंतर आहे. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर गुरमीतवर निशाणा साधला होता.

प्रणाली मोरे

Debina Bonnerji Birthday: टेलीव्हिजन अभिनेत्री देबिना बॅनर्जी आज ४० वर्षांची झाली, सध्या ती तिचं आईपण एन्जॉय करत आहे. गेल्या वर्षी तिच्या घरात एक नाही तर दोन दोन क्युट पाहुण्यांची एन्ट्री झाली आहे. एका वर्षाच्या आत देबिना दोन क्युट मुलींची आई बनली. एवढ्या कमी वेळात दोन वेळा प्रेग्नेंट होण्यामागचं कारणही खूप खास आहे. चला जाणून घेऊया अभिनेत्रीनं एवढा मोठा निर्णय का आणि कुणामुळे घेतला?

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरीनं १५ फेब्रुवारी २०११ साली लग्न केलं होतं. दोघंहीजणं 'रामायण' या हिंदी मालिकेत आपल्याला एकत्र दिसले होते. गुरमीतनं राम तर देबिनानं सीता मय्या साकारल्या होत्या. प्रेक्षकांनी देखील या जोडीला खूप पसंत केलं होतं. अर्थात या मालिकेआधीपासूनच देबिना आणि गुरमीत एकमेकांच्या प्रेमात होते. (Debina bonnerji birthday know why actress gave birth two child in a year gurmeet chaudhary)

देबिनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मुलीमध्ये फक्त सात माहिन्याचं अंतर आहे. ३ एप्रिल २०२२ रोजी देबिना बॅनर्जीनं आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला. तर काही महिन्यानंतर लगेच देबिनानं आपल्या दुसऱ्यां प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. २०२२ मध्ये ११ नोव्हेंबर रोजी देबिना आणि गुरमीतनं दुसऱ्या मुलीचं स्वागत केलं.

देबिनाच्या प्रेग्नेंसी दरम्यान सोशल मीडियावर खूप सारे प्रश्न उठले. एवढ्या कमी वेळात दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिल्यानं अनेकांनी गुरमीतवर निशाणा साधला होता. तेव्हा गुरमीतनं सांगितलं होतं की त्यानं आणि देबिनानं हा निर्णय का घेतला होता. गुरमीत म्हणाला होता की त्याच्या मोठ्या भावात आणि त्याच्यातही वयाचं अंतर खूप कमी होतं.

गुरमीतला वाटतं की दोन मुलांमध्ये वयाचं अंतर कमी असेल तर एकत्र वाढताना खूप मदत होते आणि अडचणी येत नाहीत. देबिना आणि तो शूटिंगच्या निमित्तानं बाहेर असतात आणि याकारणामुळे त्यांचे शेड्युल कायम बिझी असते. त्यामुळे त्याला वाटायचं की आपल्या मोठ्या मुलीला कोणीतरी भाऊ किंवा मित्र हवा. तसंच देबीनाची आयव्हीएफ ट्रीटमेंट सुरू होती आणि त्यामुळे ती देखील गुरमीतच्या मताशी सहमत होती.

देबिनाच्या मोठ्या मुलीचं नाव लियाना आणि छोट्या मुलीचं नाव दिवीशा आहे. देबिनाच्या दुसऱ्या मुलीचा जन्म सर्जरीच्या माध्यमातून झाला होता. हे बाळ प्रीमॅच्युअर होतं त्यादरम्यान देबिनाला खूप त्रास सहन करावा लागला होता. आता देबिना आपल्या दोन्ही मुलींसोबत खूप खूश आहे आणि सोशल मीडियावर नेहमीच आपल्या मुलींसोबत ती फोटो शेअर करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT