pathaan, deepika padukon, shah rukh khan  SAKAL
मनोरंजन

Pathaan Movie: पोरं थंडीत गारठली पण मागे नाही हटली.. मॉर्निंग शो ला आलेल्या प्रेक्षकांचं दीपिकाला कौतुक

अनेक वाद विवादा नंतर पठाण चित्रपट आज प्रदर्शित झाला.

Devendra Jadhav

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पठाण' आज म्हणजेच 25 जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. गेल्या महिन्यापासून पठाण चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती.‌ अनेक वाद विवादा नंतर पठाण चित्रपट आज प्रदर्शित झाला. चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील थेटर बाहेरची प्रेक्षकांची गर्दीचा नजारा दाखवला आहे. हि गर्दी पाहून दीपिका खुश झाली आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती पहिल्या पासून आहे. चेन्नई एक्स्प्रेस , हॅप्पी न्यू इयर नंतर आता परत ही जोडी पठाण चित्रपटात दिसली आहे. पठाण चित्रपटाला घेऊन झालेले वाद अजून थांबले नाही तरीही चित्रपट रिलीज झाला आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या चाहत्यांनी तिकीट बुकिंग केले होते तर दीपिका पदुकोण देखील चित्रपटाला घेऊन उत्सुक असणारच तिने स्वतः इंस्टाग्रामवर स्टोरीवर‌ थेटर बाहेरची प्रेक्षकांची गर्दीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

लोअर परळ येथे सकाळी ७ वाजल्यापासून थेटर बाहेर प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. सध्या मुंबईत जबरदस्त थंडी आहे तरीही इतक्या थंडीत सकाळपासून थेटर बाहेर प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दीपिका पदुकोणने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

पठाण चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. तसेच पठाण या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकींमध्येच दमदार कमाई केली आहे. अनेक ठिकाणी पठाणचे हाऊसफुल्ल शोज सुरु आहेत. पहिल्याच दिवशी पठाण ने प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी मिळवली आहे.

शाहरुखचा पठाण रिलीजच्या पहिल्याच दिवशी पाहावा यावा यासाठी ८ लाखांपेक्षा जास्त तिकिटे बुक करण्यात आली आहेत. तसेच याबाबतीत पठाणने बाहुबली २ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. तसेच बाहुबली २’ची ६ लाख ५० हजार तिकिटे बुक करण्यात आली होती.

या तुलनेत ‘पठाण’ हा चित्रपट पुढे आहे.पठाण सिनेमात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय डिंपल कपाडिया, आशुतोष राणा आणि गौतम रोडे देखील आहेत. पठाण मध्ये सलमान खान एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा २५ जानेवारीला रिलीज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT