deepika padukon did jawan cameo for free only for shah rukh khan  SAKAL
मनोरंजन

Jawan Deepika Padukon: "शाहरुख फक्त तुझ्यासाठी!", दीपीकाने शाहरुखच्या जवानसाठी एकही रुपये मानधन घेतलं नाही

दीपीकाने शाहरुखच्या जवानसाठी फुकटात काम केल्याचा खुलासा झालाय

Devendra Jadhav

Deepika Padukon Jawan News: दीपीका पादुकोन ही शाहरुखच्या जवानमध्ये झळकली. दीपीकाने शाहरुखच्या जवानमध्ये छोटीशी भुमिका साकारुन सर्वांचं मन जिंकलं. दीपीकाची छोटीशी भुमिका संपूर्ण सिनेमाभर छाप पाडते.

चेन्नई एक्सप्रेस, पठाण असो की शाहरुखचा जवान, दीपीका - शाहरुखची जोडी आजपर्यंत सुपरहिट ठरली. शाहरुखच्या जवानसाठी दीपीकाने एकही रुपये मानधन घेतलं नसल्याचा खुलासा झालाय.

(deepika padukon did jawan cameo for free only for shah rukh khan)

शाहरुखच्या सिनेमासाठी सर्व काही: दीपीका पादुकोण

द वीकला दिलेल्या मुलाखतीत, दीपीकाला तिच्या कॅमिओ आणि चित्रपटांमध्ये विशेष भूमिकांसाठी शुल्क आकारले जाते की नाही हे विचारण्यात आले. यावर दीपीका म्हणाली, "शाहरुख खानचा कोणत्याही सिनेमात स्पेशल अपिअरन्स असो मी तिथे आहेच. रोहित शेट्टीच्या बाबतीतही तेच. मी यासाठी कोणतीही वेगळी फी घेत नाही”

शाहरुखसोबतच्या तिच्या समीकरणाबद्दल तिने सांगितले की, “आम्ही एकमेकांचे लकी चार्म आहोत. पण प्रामाणिकपणे, आपण नशिबाच्या पलीकडे आहोत. आमची एकमेकांवर हक्क सांगतो… मी शाहरुखच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे जिथे तो दिलखुलास असतो. मला शाहरुखबद्दल खूप विश्वास आणि आदर आहे."

रणवीर असो वा रोहीत शेट्टी दीपीका असतेच

दीपीका पुढे म्हणाली, "मला 83 सिनेमाचा एक भाग व्हायचे होते कारण मला माझ्या पतीच्या चांगल्या सिनेमाच्या मागे उभ्या असलेल्या स्त्रियांसाठी एक निमित्त बनायचे होते. मी माझ्या आईला ते करताना पाहिलंय. आपल्या पतीच्या करिअरसाठी त्याग करणाऱ्या पत्नींना मला उदाहरण बनायचं होतं."

एकुणच शाहरुख असो, रणवीर वा रोहीत शेट्टी दीपीका पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेसाठी मानधन घेत नाही हे उघड झालंय

जवानबद्दल थोडंसं...

जवान या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, योगी बाबू, सुनील ग्रोव्हर आणि इतर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT