Deepika Padukone asked about her bhagwa bikini song, see what actress says... Google
मनोरंजन

Pathaan: एअरपोर्टवरच दीपिकाला केला गेला 'बेशरम रंग' गाण्यावर सवाल, अभिनेत्रीचं बिनधास्त उत्तर..

'पठाण' सिनेमात 'बेशरम रंग' गाण्यावरनं देशभरात संतापाची लाट उसळली असताना दीपिका पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली अन् गाण्यावर बोलली देखील.

प्रणाली मोरे

Pathaan: दीपिका पदूकोण सध्या 'पठाण' मधील 'बेशरम रंग' गाण्यावरनं सुरु असलेल्या वादामुळे जोरदार चर्चेत आहे. गाणं रिलीज झाल्यानंतर काही तासातच तुफान व्ह्यूज मिळवून गेलं पण दुसऱ्याच क्षणाला वादानं डोकं वर काढलं अन् देशभरात संतापाची लाट उसळली. दीपिकानं गाण्यात विविध रंगाच्या बिकिनी घातल्या आहेत पण त्यातील भगव्या रंगाच्या बिकिनीवरनंच मोठा वाद पेटला आहे. (Deepika Padukone asked about her bhagwa bikini song, see what actress says...)

या वादा दरम्यान दीपिकाला शनिवारी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं. यावेळी रणवीर सिंग तिला एअरपोर्टला सोडायला आला होता. गाडीमधून उतरताच पापाराझीनं दीपिकाला आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. एवढचं नाही तर 'बेशरम रंग' गाण्या संदर्भात मीडियाच्या फोटोग्राफर्सनी तिच्याशी बातचीतही केली. दीपिकाला त्यांनी गाणं आवडल्याचं सांगताच ती त्यांना 'थॅंक्यू' देखील म्हणाली. आणि हे म्हणताना गाण्यावरनं सुरु असलेल्या वादाची सावलीही तिच्या चेहऱ्यावर पडलेली दिसली नाही.

दीपिकाच्या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मीडियाच्या एका फोटोग्राफरनं तिला विचारलं, 'तू फिफा वर्ल्ड कप साठी जात आहेस ना, तिथे गेल्यावर मैसी सोबत नक्की फोटो क्लीक कर. आम्ही सगळे त्याचे चाहते आहोत'. तेव्हा दीपिका म्हणाली,''हो नक्की सांगेन''. आणि हसत हसत निघून गेली.

दीपिकाच्या एअरपोर्टवरील हावभावांना पाहून तरी वाटतंय की भगव्या बिकिनीवरनं सुरु असलेल्या वादाचा तिला काहीच फरक पडलेला नाही. ती आपल्या कामाविषयी खूप फोकस आहे. माहितीसाठी सांगतो की फीफा वर्ल्ड कपमध्ये शाहरुख आणि दीपिका 'पठाण' चे प्रमोशन करणार आहेत. दीपिकाचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तिच्या चाहत्यांनी तिची भरभरुन प्रशंसा केली. कोणी तिच्या आत्मविश्वासाचं कौतूक केलं तर कुणी तिच्या बिनधास्तपणाचं. अनेकजण तिला पाठिंबा देताना म्हणाले,'कोणी काहीही म्हणो आम्ही तुझ्या कायम पाठीशी आहोत'.

'बेशरम रंग' गाण्याविषयी बोलायचं झालं तर जेव्हा गाणं रिलीज झालं तेव्हापासून वाद सुरु आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गाण्यावर आक्षेप घेतला. आपल्या व्हिडीओला शेअर करत ते म्हणाले होते,'सिनेमाला मध्यप्रदेशमध्ये रिलीज होऊ देणार नाही'. देशात अनेक स्तरावर सिनेमाला विरोध होत असला तरी बॉलीवूडमधनं मात्र सिनेमाला पाठिंबा दिलं जातोय. अनेक कलाकारांचा आणि दिग्दर्शकांचा यात समावेश आहे.

या सगळ्या वादा दरम्यान शाहरुख खान कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेला होता तेव्हा त्यानं अप्रत्यक्षपणे यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानं म्हटलं आहे की,''गेल्या काही दिवसांपासून यायचं ठरवलं तरी इथे येऊ शकत नव्हतो. आता जग नॉर्मल झालं आहे. आपण सगळे खूश आहोत आता. आता हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो की,कोणी काहीही करो पण मी,तुम्ही आणि हे जग ज्यात जे पॉझिटिव्ह विचार करतात ते सगळे जिवंत आहोत. आणि यासाठी थॅंक्यू व्हेरी मच''.शाहरुखचा 'पठा'ण सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT