Deepika Padukone sakal
मनोरंजन

Deepika Padukone: ट्रोल झाल्यानंतर अखेर दीपिका आलियाच्या मेट गाला डेब्यूवर बोललीच.. म्हणाली 'अगं तु तर...'

आलिया भट्ट बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Aishwarya Musale

आलिया भट्ट बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने नुकतेच मेट गाला 2023 मध्ये पदार्पण केले आणि या वेळी अभिनेत्रीने रेड कार्पेटवर पर्ल एम्बेलिश्ड गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

त्याच वेळी, मेट गाला रेड कार्पेटवर लोकांचे लक्ष वेधण्यापूर्वी आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि बीटीएसचे क्षण दाखवले. काही वेळातच तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे दीपिका पदुकोणच्या या पोस्टवरील कमेंटनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले

मेट गालामध्ये आलियाच्या पदार्पणाच्या काही तास आधी दीपिकाने ऑस्करमधील जुने फोटो शेअर केले होते. आलियाची लाइमलाइट चोरण्याचा प्रयत्न केल्यामुळे दीपिकाला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होते. ऑनलाइन ट्रोलिंग आणि टीका दरम्यान, दीपिका पदुकोण आता आलिया भट्टच्या बीटीएस व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली.

तिने आलियाच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिले, "तू करून दाखवले!" त्यानंतर लाल हार्ट इमोजी टाकला.दुसरीकडे, आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिची मुलगी राहा पासून जास्त काळ दूर राहण्याबाबत बोलताना दिसत आहे.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, आलिया पुढे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. ती कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत जी ले जरा मध्येही दिसणार आहे.

आलिया या वर्षी गॅल गॅडोट आणि जेमी डोरन स्टारर 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दुसरीकडे, दीपिका पदुकोण लवकरच 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर तिचा प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के'ही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Pudina Rice Recipe: नॉन-व्हेजलाही विसरायला लावेल गरमागरम पुदीना राईस; पावसाळ्यात लंचसाठी एकदा नक्की ट्राय करा

Marathi Live Updates : मुसळधार पावसाने अंबा नदीचा जोडरस्ता जलमय, राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT