deepika padukone gate bold and intimate scene after marriage, she said my husband ranveer singh.. esakal
मनोरंजन

Deepika Padukone Birthday: लग्नानंतरही बिनधास्तपणे बोल्ड आणि इंटीमेट सीन देते दीपिका पदूकोण, कारण..

दीपिकाचा आज वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

सकाळ डिजिटल टीम

Deepika Padukone Birthday: आज अभिनेत्री दीपिका पदूकोण हिचा वाढदिवस. सध्या ती बरीच चर्चेत आहे. तिच्या आगामी 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून सुरू झालेला वाद अद्याप मिटलेला नाही. या गाण्यात दीपिका भगव्या बिकिनीमध्ये भलतीच बोल्ड दिसली. यावर बरीच टीका देखील झाली. पण दीपिकाने त्याकडे दुर्लक्ष केले. ती कायमच अशा बोल्ड भूमिका बिनधास्तपणे करत असते, अगदी तिच्या लग्नानंतरही. अनेकांना ती लग्नानंतर अशा भूमिका करणार नाही असे वाटले होते, पण ते साफ खोटे ठरले. ती या भूमिका अगदी सहज आणि धिटाईने करते त्यामागेही एक कारण आहे.. तेच जाणून घेऊया..

(deepika padukone gate bold and intimate scene after marriage, she said my husband ranveer singh..)

आज दीपिकाचा ३८ वा वाढदिवस. दीपिकाने बॉलीवुडमध्ये असे काही काम केले आहे की तिच्या नावाला मोठा मान आहे. तिचे कर्तुत्व तिने अनेक ठिकाणी दाखवून दिले आहे. मग ते फिफा वर्ल्ड कप असो किंवा कान्स मधील तिचे भाषण. ती कायमच वेगळी ठरली आहे. असेच वेगळेपण दाखवले आहे. तिच्या भूमिकांनी. तिने अनेकदा बोल्ड भूमिका केल्या आहेत. मग अगदीच आताचा 'गहरायईया' असो किंवा 'बेशरम रंग' गाणं.. अगदी लग्न होऊनही ती अशा भूमिकांसाठी पुढे असते. हे कसं शक्य आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता, पण याविषयी तिथे आपले स्पष्ट मत मांडले होते.

दीपिका आणि रणवीर सिंग 2018 मध्ये विवाह बंधनात अडकले. ते सध्या सुखाने संसार करतात पण अशा बोल्ड सीन नंतर तुमच्या नात्यावर परिणाम होतो का असे तिला वारंवार विचारले जाते. त्यावर दीपिका म्हणाली होती, 'जर यावर मी प्रतिक्रिया दिली तर तो मुर्खपणा ठरेल. आपण केलेल्या कामावर लोक काय म्हणतात, काय कमेंट करतात याचा मी कधीच कमेंट्स वाचत नाही आणि मला वाटतं रणवीरही ते करत नसावा. अगदीच रणवीर विषयी सांगायचं तर तो माझा नवरा असला तरी तो अशा भूमिका करण्यापासून अडवत नाही. उलट त्याला माझ्या कामाचा अभिमान वाटतो.'

मी बिनधास्त बोल्ड सीन देऊ शकते याचं श्रेय पती रणवीरलाच आहे . त्याच्यामुळेच मी एवढी बोल्ड झाले. कारण त्याचे विचार चांगले आणि पुरोगामी आहेत म्हणून मी इतक्या सहज काम करू शकते'.असंही ती म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT