Deepika Padukone On Pathaan Controversy Instagram
मनोरंजन

Deepika Padukone:'पठाण वादा दरम्यान मी आणि शाहरुख गप्प राहिलो याचं एक कारण होतं'; दीपिकानं केला मोठा खुलासा

'पठाण' सिनेमात 'बेशरम रंग' गाण्यातील भगव्या बिकिनीवरनं मोठा वाद रंगला होता..या वादावर राजकीय गटातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

प्रणाली मोरे

Deepika Padukone: शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण सध्या आपल्या 'पठाण' सिनेमाची बॉक्सऑफिसवर सुरू असलेली घोडदौड पाहून खूश आहेत. तसं पाहिलं तर सिनेमा रिलीजच्या आधी भलताच वादात सापडला होता.

पण एवढ्या वादानंतरही 'पठाण'च्या कमाईवर तसूभरही फरक पडला नाही. 'पठाण'चं गाणं 'बेशरम रंग' मध्ये दीपिका पदूकोणनं भगव्या रंगाची बिकिनी घातल्यानं मोठा वाद पेटला होता.

अशामध्ये लोकांनी प्रश्न निर्माण केला होता की दोन्ही स्टार्स या वादा दरम्यान शांत कसे राहिले. नुकतंच दीपिका पदूकोणनं आता यावर खुलासा केला आहे.

तिनं वादादरम्यान गप्प बसण्यामागचं कारण सांगितलं आहे.(Deepika Padukone On Pathaan Controversy reveal reason to stayed calm on this)

काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटशी बातचीत करताना दीपिका पदूकोणनं आपलं मौन सोडत मोठा खुलासा केला आहे.

तिनं सांगितलंकी एका स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असलेल्या कौटुंबिक वातावरणात मी वाढले आहे त्यामुळे तिथे मला संयम कसा ठेवावा याची शिकवण खूप चांगली मिळाली आहे. खेळ तु्म्हाला कोणत्याही गोष्टीवर संयम कसा ठेवावा ही गोष्ट शिकवतो. सिनेमाला यश मिळाल्यानंतर आता जाऊन दीपिकानं पहिल्यांदा 'पठाण' वादावर भाष्य केलं आहे.

ती पुढे म्हणाली की,'' शाहरुख आणि ती दोघं असे लोक आहेत जे एखाद्या गोष्टीशी असलेली बांधिलकी, विनम्रता आणि कठीण परिश्रम यांना सर्वात अधिक महत्त्व देतात. मी आम्हा दोघांबाबतीत बोलू शकते की यापेक्षा दुसरा मार्ग आम्हाला माहित नाही''.

''मला वाटतं की आम्ही तेच केलं जे आम्हाला आमच्या कुटुंबाकडून शिकवलं गेलं आहे. आम्ही मुंबईत स्वप्न घेऊन आलो आणि आमचा प्रवास एकट्यानं सुरू केला. आम्हाला केवळ बांधिलकी, माणूसकी आणि कठीण परिश्रम माहित आहेत. हे सगळं अनुभवानं आणि समजुतदार वागण्यातनं येतं''.

दीपिकाचं हे स्टेटमेंट जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

'पठाण' सिनेमाविषयी बोलायचं झालं तर दीपिका,शाहरुख व्यतिरिक्त सिनेमात जॉन अब्राहम देखील होता. सोबत सलमानही कॅमियो साकारताना दिसला होता.

'पठाण' ने भारतात ५२६ करोडचा बिझनेस केला तर जगभरात १०२२ करोड रुपये कमावले. सिनेमाचं हिंदी भाषेतलं कलेक्शन ५०८ करोड रुपये होतं.

'पठाण'ला आता महिना झाला रीलिज होऊन तरी कमाईच्या दिशेने त्याची घोडदौड सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat : निवडणुकीपूर्वीच महापौरपदाचे बाशिंग! पालकमंत्री शिरसाट यांच्या पुत्राला शुभेच्छा देणारे शहरात झळकले होर्डिंग्ज

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात कंटेनरची तीन वाहनांना धडक, भोस्ते घाटातील घटना

Jinti Mahadev Temple: 'जिंतीच्या महादेव मंदिरात सापडलेल्या शिलालेखात यादवकालीन संदर्भ'; सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर उलगडले दोन लिंगांचे गूढ

Jitendra Awhad: जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्याची ठाण्यात पुनरावृत्ती, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Weight Loss Fruits Breakfast: वजन कमी करण्याचा विचार करताय? मग नाश्त्यात 'या' फळांचे करा सेवन

SCROLL FOR NEXT