dhoom 4 deepika 
मनोरंजन

अभिनेत्री दीपिका पदूकोण 'या' सिनेमात साकारणार खलनायिकेची भूमिका

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- यशराज फिल्मने येणा-या वर्षांमध्ये त्यांचे काही बडे सिनेमे लॉन्च करण्याची योजना आखली आहे मात्र यामध्ये एका सिनेमाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. हा सिनेमा त्याच्या स्टायलिश सिक्वेन्स आणि काही परदेशातील लोकेशन्ससाठी ओळखला जातो. प्रसिद्ध फ्रँचायजीमधील हा सिनेमा म्हणजे 'धूम ४'. आत्तापर्यंतच्या प्रसिद्ध फ्रँचायजीमधील ही यशस्वी फ्रँचायजी मानली जाते.  

धूम सिनेमाच्या आत्तापर्यंतच्या तीनही फ्रँचायजींना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. जेव्हा पण या सिनेमासाठी मुख्य भूमिकेबद्दल चर्चा होते तेव्हा ते सगळ्यांसाठी मोठं सरप्राईज असतं. या सिनेमाच्या सिरीजच्या पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुस-या भागात हृतिक रोशन तर तिस-या भागात आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती. यशराज फिल्म्सच्या सगळ्यात स्टायलिश ऍक्शन फ्रँचायजी 'धूम ४' साठी  आता सगळेजण उत्सुक आहेत. या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांना आता यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाहीये.

२०२० मध्ये 'धूम ४' बद्दल अनेक बातम्या आल्या ज्यामध्ये बॉलीवूडच्या वेगवेगळ्या कलाकारांची नावं जोडली गेली होती. मात्र सिनेमाच्या निर्मात्यांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. त्यानंतर सगळ्या गोष्टी अफवा असल्याचं म्हटलं गेलं. आता असं समजतंय की वाय आर एफने 'धूम' सिरीजच्या या चौथ्या भागात एक महिलेला खलनायिकेची भूमिका देण्याचा निर्णय घेतला आहे. यशराज बॅनरच्या 'धूम ४' या सिनेमात दीपिका पदूकोणला स्टायलिश चोरी करणा-या पात्रामध्ये सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

दीपिका पदूकोण आणि यशराज फिल्म्स यांच्यामध्ये याविषयीची चर्चा सुरु आहे. दीपिका तिच्या शूटींगच्या तारखेमध्ये या तारखा ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. जर तारखांमध्ये सगळं काही व्यवस्थित झालं तर 'धूम ४' मध्ये अशी ऍक्शन पाहायला मिळेल जी आत्तापर्यंतच्या सिरीजमध्ये बघितली गेली नव्हती. यावेळी यामध्ये हॉलीवूडच्या तोडीस तोड ऍक्शन पाहायला मिळतील असं समजतंय.   

deepika padukone to play lead role of villain in dhoom franchise film dhoom 4  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT