Deepika Padukone, Ranveer Singh twin in black and white as they have fun on a yacht.Video Google
मनोरंजन

Video: घटस्फोटाच्या अफवे दरम्यान बोटीवर मजामस्ती करताना दिसले दीपिका-रणवीर, क्यूट व्हिडीओनं वेधलं लक्ष

दीपिका-रणवीर गेले अनेक दिवस कुठेच एकत्र दिसले नव्हते त्याकारणानं त्यांच्या रिलेशनशीपवर शंका व्यक्त केल्या जात होत्या.

प्रणाली मोरे

Video: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच उलट-सुलट चर्चा कानावर पडत होत्या. दोघांमध्ये दुरावा आला आहे, ते विभक्त होतायत अशा अनेक अफवांवर रणवीरने एक व्हिडीओ पोस्ट करत सडेतोड उत्तर दिले आहे. आता हा व्हिडिओ सर्व सांगत आहे या दोघांमध्ये सगळं काही ओके आहे. (Deepika Padukone, Ranveer Singh twin in black and white as they have fun on a yacht.Video)

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

बऱ्याच दिवसांनी रणवीर सिंगने पत्नी दीपिका पदुकोण सोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला. ज्यामध्ये दीपिका आणि तो एका यॉटवर प्रवास करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ते परदेशात आऊटिंगसाठी गेल्याचं दर्शवत आहे.

हा व्हिडिओ रणवीर सिंगनं शेअर केला आहे. रणवीर सिंगने व्हिडीओ पोस्ट करत दीपिका पदुकोणसाठी “#cutie” असं लिहिले आहे. त्याने व्हिडिओमध्ये ‘गुड व्हायब्स’ टॅग देखील जोडला आहे. यात दीपिका एका यॉटवर रणवीरच्या समोर बसलेली दिसते. ती पांढरा टी-शर्ट, पांढरे शूज आणि सॉक्ससह काळ्या शॉर्ट्समध्ये आहे. रणवीर तिच्यासोबत पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या ट्रॅक पॅंटमध्ये आणि नियॉन रंगाची चप्पल पायात घालून दिसत आहे. दोघांनी आपलं ड्रेसिंग एकदम मॅचिंग ठेवलेलं आहे. ते यॉटवर त्यांचा वेळ एन्जॉय करत असताना, दीपिका काहीतरी बोलताना दिसतेय आणि अचानक ती तिच्या समोर पाय पसरुन बसलेल्या रणवीरच्या पायांवर फटका मारते.

तर व्हिडीओत दीपिका तिच्या पतीसोबत बोट चालवतानाही दिसली. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनं सोशल मीडियावरही त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला.

दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच किंग खानच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. बरेच दिवस लोक या चित्रपटाच्या टीझरची वाट पाहत होते. सर्वांचा चांगला प्रतिसादही टीझरला मिळालेला पाहायला मिळाला. लोकांनीही दीपिकाच्या हाय व्होल्टेज अभिनयाचे कौतुक केले. रणवीर सिंगकडे सध्या रोहित शेट्टीचा 'सर्कस', करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 2005 च्या तमिळ ब्लॉकबस्टर 'अन्नियां'चा रिमेक असे सिनेमे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT