Deepika Padukone Rishi Kapoor To Star In The Intern Remake 
मनोरंजन

हॉलिवूड सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार दीपिका !

वृत्तसंस्था

मुंबई : नवीन वर्ष सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांसाठी दोघांसाठी खूप खास आहे. वर्षाची सुरुवात ब्लॉकबस्टर चित्रपटांनी झाली आणि चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली. बहुचर्चित 'छपाक' चित्रपटही रिलिज झाला. या चित्रपटाने बॉक्सऑफिसच्या आकड्यांवर कमाल केली नसली तरी मात्र प्रेक्षकांच्या पसंतीमध्ये तो उतरला आहे. 'छपाक' नंतर आता दीपिका पुढच्या कामाकडे वळली आहे. हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध चित्रपटाच्या रिमेकमध्ये ती लवकरच झळकणार आहे. 

दीपिका एक टॅलेंटेड स्टार आहे. आजवर तिने साकारलेल्या भूमिका या चौकटीबाहेरच्या आहेत आणि त्यांना संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न ती करते. सुपरहिट सिनेमे तिने केलेच आणि थेट हॉलिवूडमध्येही स्थान मिळवलं. दीपिकाचा 'छपाक' तान्हाजीसमोर टिकू शकला नाही. पण, सर्व काही विसरुन नव्या प्रोजेक्टसाठी ती सज्ज झाली आहे.

हॉलिवूडचा सुप्रसिद्ध चित्रपट ''The Intern'' हा जगभरात पाहिला गेला. त्याचा रिमेक लवकरच बॉलिवूडमध्ये तयार होतोय. यामध्ये मुख्य भूमिकेत दीपिका दिसणार आहे. विशेष म्हणजे कॅन्सरवर इलाज करुन परतलेले ऋषी कपूरही दीपिकासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याची अधिकृत घोषणा दीपिकाने तिच्या इनस्टाग्रामवर केली आहे. 

काय आहे The Intern ?

The Intern हा चित्रपट खूप फेमस झाला. वाचकांपैकी अनेकांनी तो पाहिलाही असेल. 2015 मध्ये रिलिज झालेल्या या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. रोजच्या आयुष्यातला हळवा विषय यामध्ये मांडला गेला आहे. 70 वर्षांचे निवृत्त बेन हे एका कंपनीमध्ये इंर्टन म्हणून कामाला लागतात. त्यांनी बॉस असणारी अॅनी ही यंग, बिझनेसवुमन आणि एक आई आहे. तिच्या हाताखाली काम करताना येणारे अनुभव आणि मग अनेक गोड-कडु प्रसंग नाजुक पद्धतीने यामध्ये हाताळले गेले आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने ऋषी कपूर कमबॅक करणार आहेत. The Intern हा मुळ सिनेमा खूप शांत असा आहे. बॉलिवूडमध्ये आणि भारतातच्या प्रेक्षकांना तो कितपत रुजतो ते पाहावं लागेल. 'छपाक' ला अपेक्षीत यश प्राप्त झालेलं नाही. पण, या चित्रपटातून ती एक वेगळा प्रयोग करु पाहतेय. हा चित्रपट पुढील वर्षी 2021 ला रिलिज होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT